शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दुपारपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दुपारपर्यंत १२६ व्यक्तींनी रक्तदान केले.  शिबिराचे उद्‌घाटन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.          या प्रसंगी गमे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इतर शस्रक्रियांसाठी आवश्यक रक्ताचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशावेळी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना आवश्यक रक्त उपलब्ध करून देणे शक्य होईल. या शिबिरात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.भारुड म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.           या वेळी डॉ.भारुड यांनी स्वत: सकाळी रक्तदान केले. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गमे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उप‍जिल्हाधिकारी सुधीर खांदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनीही शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले.