तळोदा येथील शिबरात २०१ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:18+5:302021-01-19T04:33:18+5:30
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर ...

तळोदा येथील शिबरात २०१ दात्यांचे रक्तदान
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तळोदाचे नगराध्यक्ष अजय परदेशी, शहादाचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, प्रा. विलास डामरे, प्रफुल्ल बुद्धिसागर, डॉ.स्वप्निल बैसाणे व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा आदी गावांमधून दात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्त संकलनासाठी नंदुरबार येथील नवजीवन रक्तपेढी व जनकल्याण रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. यात नवजीवन रक्तपेढीचे डॉ.सुनील चौधरी, दीपक जाधव, कैलास पाटील, गजानन चौधरी, चंद्रकांत धनगव्हाळ, मेघना जाधव, भावना जाधव तसेच जनकल्याण रक्तपेढीचे प्रकाश भोई, पुष्पा नायक, रोहित शिंदे ,अमोल माने, मदतनीस गोरख भिल व संजय सूर्यवंशी यांनी काम पाहिले. शिबिरासाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे संचालक जगन्नाथ मराठे, गुलाबराव चव्हाण, आदित्य मालपुरे, अभिषेक मालपुरे, कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक सी.एम. पाटील, जांभीपाणी येथील विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ईश्वर चौधरी, हरी भारती, भूषण येवले, हंसराज महाले, दिनेश मराठे, दीपक मालपुरे, मनोज चिंचोले, पुरुषोत्तम चिंचोले, भीमा महाले, रतिलाल मराठे, संदीप पाठक यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.