शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे प. बंगालमधील हिंसाचाराचा विरोध, तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

नंदुरबार : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करत भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे ...

नंदुरबार : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करत भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुका झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्याबरोबर त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हाताशी धरून ममता बॅनर्जी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करणे, त्यांचा खून करणे, भाजप कार्यालयाची तोडफोड करणे असे निंदनीय प्रकार सुरू केले. या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष नंदुरबार जिल्हा कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना याविषयीचे निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात खासदार डाॅ. हिना गावित, जिल्‍हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, नगरसेवक गौरव चौधरी, महिला मोर्चा तळोदा तालुकाध्यक्ष भारती पावरा, संजय पाटील, आदी सहभागी झाले होते.