शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

भाजप व सेनेत ‘बॅनर’ वॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:08 PM

बैठकीत सेनेचा बहिष्कार : मोदी यांच्या सभेच्या नियोजनाची बैठक

नंदुरबार : निवडणुकीच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे किंवा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याच्या कारणावरून संतप्त शिवसेना पदाधिका:यांनी भाजपच्या नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकत काढता पाय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 22 एप्रिल रोजी नंदुरबारात जाहीर प्रचार सभा आहे. या सभेच्या नियोजनासाठी बुधवारी नंदुरबारात भाजप व मित्र पक्षाच्या पदाधिका:यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, उमेदवार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, प्रदेश संघटन मंत्री किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, डॉ.कांतिलाल टाटीया, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, डॉ.रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते. बैठकीच्या व्यासपीठावरील बॅनरवर केवळ नरेंद्र मोदी व उमेदवार डॉ.हिना गावीत यांचे छायाचित्र होते. युती असतांना मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना त्यावर स्थान दिले नाही याबाबत जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, तालुका प्रमुख रमेश पाटील व पदाधिका:यांनी विचारणा केली. भाजप पदाधिका:यांना समपर्क उत्तर देता न आल्याने पदाधिका:यांनी चालू बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळे बैठकीत काही काळ गंभीर वातावरण निर्माण झाले. शिवसेना पदाधिकारी निघून गेल्यानंतर भाजप पदाधिका:यांच्या उपस्थितीतच पुढे बैठक चालू ठेवण्यात येवून नियोजन करण्यात आले. दरम्यान, आक्रमक शिवसैनिकांनी भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत गांभिर्याने घ्यावे लागेल असा इशारा देत सुरुवातीपासूनच भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला.