महुफूलापासून बिस्कीटचा प्रकल्प रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:27 IST2019-08-25T12:27:24+5:302019-08-25T12:27:39+5:30

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात ...

Biscuit project stopped from Mahufula! | महुफूलापासून बिस्कीटचा प्रकल्प रखडला!

महुफूलापासून बिस्कीटचा प्रकल्प रखडला!

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात या झाडांची विपुलता लक्षात घेता या फुलांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. महुफुलांमधील जीवनसत्व लक्षात घेता त्यापासून बिस्कीट तयार करण्याचा प्रकल्प देखील असाच बारगळला आहे.       
सातपुडय़ाच्या द:याखो:यात महुफूलांची झाडे विपूल प्रमाणात आहेत. या फुलांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण देखील अधीक आहे. सातपुडय़ात जागोजागी आणि सहज उपलब्ध होणा:या या झाडांच्या फुला,फळांचा उपयोग स्थानिक आदिवासींसाठीच करून घ्यावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजना आहेत. काही संस्थांनी महू फुलाच्या झाडाचे अत्याधुनिक कलमे देखील उपलब्ध करून दिली आहेत. कमी कालावधीत मोठे होणारे आणि फुल,फळ देणारे हे कलम आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. परंतु केवळ फुलांचे आणि टोळंबीचे उत्पादन घेवून उपयोग नाही तर त्यांच्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ देखील निर्माण होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात महूफुलांपासून बिस्कीट तयार करण्याचे स्थानिक उद्योग आहेत. 
या बिस्किटांना चांगली मागणी देखील आहे. कुपोषीत मुलांसाठी ती उपयोगी ठरतात. ती बाब हेरून जिल्ह्यातील बचत गटांना देखील या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही बचत गटांना गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी देखील पाठविण्यात आले. तेथून प्रशिक्षण घेवून ते आले देखील परंतु स्थानिक स्तरावर त्याचे युनिट सुरू करण्यासंदर्भात फारशी उत्सूकता दाखविली गेली नसल्याचेच चित्र आहे. ज्या ठिकाणी या युनिटला जागा हवी आहे किंवा तत्वत: मंजुर आहे तेथे खुद्द आदिवासी विकास विभागाच त्याला ना हरकत दाखला देत नसल्याची स्थिती आहे. 

प्रक्रिया उद्योगांची नुसतीच घोषणा.. सातपुडय़ात  महूफुल, आंबा, सिताफळ यांची झाडे मोठय़ा प्रमाणावर आहे. सिझननुसार आदिवासी कुटूंब या झाडांपासून ब:यापैकी उत्पादन मिळवत असतात. परंतु स्थानिक ठिकाणीच या झाडांच्या फळावरील प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण बदलणार आहे. परिणामी आरोग्य आणि आर्थिक समस्याही सुटणार आहे. परंतु वेळोवेळी राजकारणी मंडळी केवळ प्रकल्प उद्योगांची घोषणा करतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. 
 

Web Title: Biscuit project stopped from Mahufula!