जैवविविधता समिती व ‘जनार्थ’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:25 IST2019-08-25T12:25:43+5:302019-08-25T12:25:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील वीरपूर, नागङिारी व कोटबांधणी या सामूहिक वनदावा मिळवलेल्या गावात लोकसहभागानतून 16 हजार ...

जैवविविधता समिती व ‘जनार्थ’चा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील वीरपूर, नागङिारी व कोटबांधणी या सामूहिक वनदावा मिळवलेल्या गावात लोकसहभागानतून 16 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. गावाला मिळालेल्या सामूहिक वनजागेवर ही रोपे लावण्यात आली आहेत. त्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वीरपूर, नागङिारी, कोटबांधणी या सामूहिक वनदावा प्राप्त झालेल्या गावातील जैवविविधता समिती व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमासाठी मेवासी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून दहा हजार रोपे विनामूल्य प्राप्त झाली होती. तसेच राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान विभाग, परिसर पुनर्निमाण व जनार्थ आदिवासी विकास संस्थेअंतर्गत तयार केलेल्या नर्सरीतील सहा हजार रोपे वापरण्यात आली. यात आंबा, सीताफळ, जांभूळ, चिंच, बोर, आवळा, महू, आवळा, वड, बेहडा, पिंपळ, कडूलिंब, बांबू आदी विविध प्रकारच्या रोपांचा समावेश होतो.
हा रोप लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागङिारीच्या सरपंच अलकाबाई पवार, विरपूरचे शंकर भिल, कोटबांधणीच्या सरपंच फकरीबाई भिल, तेरसिंग पावरा, खजान भिल, बारसिंग पवार, शिवाजी भिल, भावसिंग कारभारी, जनार्थ आदिवासी विकास संस्थेच्या वतीने चुनिलाल ब्राrाणे, दिलवर पाडवी, छगन भिल, करम्या पवार, बारक्या पवार, दादाभाई सामुद्रे, रमाजाबाई भिल, सुमीबाई पवार आदींनी परिश्रम घेतले.