उभ्या ट्रकला दुचाकी धडकली, दोन युवक ठार
By मनोज शेलार | Updated: December 19, 2023 19:15 IST2023-12-19T19:15:08+5:302023-12-19T19:15:36+5:30
दोन्ही युवकांची पक्की मैत्री परिसरात चांगलीच परिचित होती.

उभ्या ट्रकला दुचाकी धडकली, दोन युवक ठार
मनोज शेलार, नंदुरबार : खांडबारा रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरूस्त मालट्रकला दुचाकीने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले. दोन्ही युवकांची पक्की मैत्री परिसरात चांगलीच परिचित होती.
परशुराम राजू मोरे (२७) व दिनेश लालसिंग गावित (२६) रा.ढेकवद, ता.नंदुरबार असे मयत युवकांचे नाव आहे. सोमवारी दुपारी परशुराम व दिनेश हे कामानिमित्त नंदुरबार येथे गेले होते. रात्री दहा वाजता ते परत ढेकवद गावी त्यांच्या दुचाकीने जात होते. गावानजीक रस्त्याच्या कडेला नादुरूस्त मालट्रक उभा होता. रात्रीच्या अंधारात त्यांना त्या मालट्रकचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी ट्रकला धडकली. त्यात दोघांना जबर मार लागला. अपघाताचा आवाज गावात आल्याने लागलीच मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेतली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत करण्यात आले. याबाबत नंदुरबार तालुका पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे.