‘भोला’च्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:05 IST2020-06-19T12:04:18+5:302020-06-19T12:05:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील परदेशीपुरा भागातील दुकानाचे शटर उचकवून केलेल्या चोरीतील ‘भोला’ला अवघ्या २४ तासात एलसीबीने अटक ...

Bhola smiled | ‘भोला’च्या मुसक्या आवळल्या

‘भोला’च्या मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारातील परदेशीपुरा भागातील दुकानाचे शटर उचकवून केलेल्या चोरीतील ‘भोला’ला अवघ्या २४ तासात एलसीबीने अटक करून २३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून इतरही घरफोडीचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
शहरातील परदेशीपुरा भागातील अगरबत्ती होलसेल विक्रेत्याचे दुकान फोडून सीसीटव्ही कॅमेरासह लॅपटाईप व रोख रक्कम असा एकुण २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज १६ रोजी चोरून नेला होता. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकानाच्या शटरची एक बाजूचे कुुलूप तोडून व ते उचकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी पहिले दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे काढले. त्यानंतर काऊंटरवर असलेला लॅपटॉप तसेच रोख ८०० रुपये चोरट्यांनी चोरून नेले. एकुण २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला होता.
याबाबत एलसीबीने समांतर तपास सुरू केला होता. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार याच भागात राहणारा गिरीष राजू वळवी (२१) उर्फ भोला, रा.परदेशीपुरा याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पथकाला पाठविण्यात आले. घरी लपून छपून येत असताना पथकाने त्याला झडप घालून ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. शिवाय चोरलेला ऐवज प्लॅस्टिकच्या गोणीत भरून घराच्या छतावर ठेवल्याचे सांगितले. तो ऐवजही जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, कर्मचारी राकेश मोरे, राकेश वसावे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

Web Title: Bhola smiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.