माळ खुर्दला प्रतिक्षा मूलभूत सुविधांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:57 IST2018-11-18T12:57:06+5:302018-11-18T12:57:10+5:30
कल्पेश नुक्ते। लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तळोदा तालुक्यातील माळखुर्द ह्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थ यंदाही दुष्काळझळा सोसत आहेत़ अनेक ...

माळ खुर्दला प्रतिक्षा मूलभूत सुविधांची
कल्पेश नुक्ते।
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तळोदा तालुक्यातील माळखुर्द ह्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थ यंदाही दुष्काळझळा सोसत आहेत़ अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या या गावात नुकतेच जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी आणि पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या भेटीनंतर हे गाव प्रकाशझोतात आले आह़े अधिका:यांच्या भेटीनंतर तरी येथे विकास होणार अशी अपेक्षा आता व्यक्त होत आह़े
तळोद्यापासून पासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर उत्तरेला असलेले माळ खुर्द हे दिवाळीच्या दिवसांमध्ये माणसांच्या वर्दळीने फुलून जात़े अस्तंबा यात्रेकरुंसाठी विसाव्याचे ठिकाण म्हणून ते परिचित असल्याने पायी जाणारे यात्रेकरु येथे थांबून विश्राम करतात़ ऐरवी मात्र 102 कुटूंबातील 538 नागरिकांचे वास्तव्य असत़े विकास या संकल्पेपासून काहीशा आडेवाटेला असलेल्या या गावात जाण्यासाठी चौगाव ता़ तळोदा येथून सात किलोमीटर कठीण अशी डोंगराची पायवाट धरुन चालत जावे लागत़े
1968 सालापासून महसूल दर्जा प्राप्त असूनही गावात पाहिजे त्या सोयी नसल्याने येथून अनेक कुटूंबांनी स्थलांतर केले आह़े चौगाव ग्रुप ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या या गावातून 2015 साली सरपंच निवडून देण्यात आला होता़ गावातील काही लोकांकडे 1927 साला पूर्वीचे सातबारे असूनही सुविधा मिळल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आह़े रस्ताच नसल्याने गावात ऐनवेळी गंभीर आजारी पडलेल्या व्यक्तीला ‘झोळी’ करुन गावातील माणसे चौगाव र्पयत आणतात़ गेल्या अनेक वर्षापासून हे नित्याचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल़े यातून काही गर्भवती माता, सर्पदंश झालेले आणि वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना योग्यवेळी उपचार न मिळाल्याने प्राणही गमवाने लागले हेत़े गावातील रस्त्याची समस्या लक्षात घेत 2004 मध्ये ग्रामस्थांनी रोहयोच्या माध्यमातून चौगावर्पयत रस्ता तयार करत सोय करुन घेतली होती़ तयार केलेला हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने पुन्हा पायवाटांनीच प्रवास सुरु आह़े शासन ग्रामस्थांसाठी घरकुल, गोठे आणि शौचालयांना मंजूरी देत असले तरी बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य वर्पयत घेऊन जाणे शक्य नसल्याने ही कामेही अधांतरी आहेत़ डोंगरद:यांमध्ये वसलेल्या माळखुर्दला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात़ जलस्त्रोत दोन किलोमीटर लांबवर असल्याने पायपीट करुन पाणी आणावे लागत़े यंदा मात्र दुष्काळामुळे हे स्त्रोत कोरडे झाल्याने समस्या अधिक वाढल्या आहेत़ यातच मका, ज्वारी आणि बाजरी यांचे उत्पादन कमी झाल्याने संकटात भर पडली आह़े शेतजमिनींमधून जादा काही पिकत नसल्याने अनेकांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले आह़े