कर्जवाटपात बँकांचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:00 IST2020-08-31T13:00:29+5:302020-08-31T13:00:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कर्जवाटपात बँकांकडून मागच्यावर्षाचाच कित्ता गिरवला गेल्याचे समोर आले आहे़ खोऱ्याने अर्ज करुनही निवडक ...

कर्जवाटपात बँकांचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कर्जवाटपात बँकांकडून मागच्यावर्षाचाच कित्ता गिरवला गेल्याचे समोर आले आहे़ खोऱ्याने अर्ज करुनही निवडक शेतकऱ्यांना कर्ज देत बँकांनी वेळ मारुन नेली असून पाच महिन्यात ३४ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वितरण करत काम पूर्ण करण्यात आले आहे़
दरवर्षी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाबाबत शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते़ यात शेतकरी अर्ज करुनही बँका त्यांचे अर्ज नाकारत असल्याचे प्रकार घडले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँक यांच्या एकूण १०३ शाखांकडून कर्ज वाटप करण्यासाठी मेळावे घेतले होते़ यानंतर यंदा १०० टक्के कर्ज वाटप होणार असे चित्र निर्माण झाले होते़ या चित्रावर बँकांनीच पाणी फेरले असून आजअखेरीस केवळ १८ हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले आहे़ जिल्ह्यात आठ राष्ट्रीयकृत बँका, चार खाजगी, एक ग्रामीण आणि एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना मिळून यंदा खरीप हंगामात ६१ हजार शेतकºयांना पीककर्ज देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांच्याकडून देण्यात आल्या होत्या़ यावर बँकांच्या अधिकाºयांनीही संमती देत कर्ज वाटपास सुरूवात केली होती़ परंतु गेले पाच महिने सुरू असलेल्या पीक कर्ज वितरणाच्या कामकाजाने गती पकडली नसल्याने यंदाही ४० हजार शेतकरी पिक कर्जाविनाच आहेत़ जिल्हा बँकेने कर्ज वाटप टक्केवारीत वरचे स्थान प्राप्त केले असले तरी विकासो आणि वैयक्तिक खाते असे कर्ज वितरण केले असून एक लाख सभासद असलेल्या बँकेने केवळ ९ हजार शेतकºयांना कर्ज दिले आहे़ परंतु त्यापैकी केवळ ९ हजार शेतकºयांना यंदा कर्ज दिले गेले आहे़
जिल्ह्यात एकूण १८ हजार ३८१ शेतकºयांना सर्व बँकांनी मिळून २०९ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज आतापर्यंत वितरीत केल्याचे यातून स्पष्ट होत आहे़
जिल्ह्यातील सहा तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्वाधिक शेतकºयांना कर्ज दिले आहे़ यात शहादा २ हजार ८६२, नंदुरबार २ हजार ६७२, नवापूर ८५७, तळोदा २२५, धडगाव ३४१ आणि अक्कलकुवा तालुक्यात ४० खातेदारांना कर्ज दिल्याची माहिती आहे़
राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांकडून शहादा आणि नंदुरबार तालुक्यात चार हजार तर नवापूर आणि तळोदा तालुक्यात तीन हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले आहे़ धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात पीक कर्ज घेऊन शेती करण्याचे प्रमाण नगण्य आहे़ खाजगी बँकांनी वाटप केलेल्या कर्जात नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील शेतकºयांचा वाटा अधिक आहे़ ग्रामीण बँकेकडून शहादा, तळोदा व नंदुरबार या तीन तालुक्यात कर्ज दिल गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे़