गढवली व निगदी येथे ३८ एकरवर बांबू लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:53 PM2020-07-11T12:53:39+5:302020-07-11T12:53:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : : तालुक्यातील गढवली व धडगाव तालुक्यातील निगदी येथे सामुदायिक वनअधिकार प्राप्त जंगल जमिनीवर संबंधित ...

Bamboo cultivation on 38 acres at Garhwali and Nigdi | गढवली व निगदी येथे ३८ एकरवर बांबू लागवड

गढवली व निगदी येथे ३८ एकरवर बांबू लागवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : : तालुक्यातील गढवली व धडगाव तालुक्यातील निगदी येथे सामुदायिक वनअधिकार प्राप्त जंगल जमिनीवर संबंधित गावातील वनअधिकार व्यवस्थापन व नियोजन समितीच्या पुढाकाराने ३८ एकर क्षेत्रावर बांबू लागवड सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी लावण्यात आलेली २५ एकरातील ८५ टक्के वृक्षे जगली आहेत. साहजिकच यामुळे या दोन्ही गावांमधील वनसंपदेत भर पडली आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. त्यातच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. साहजिकच गावस्तरावरील वनव्यवस्थापन समित्यांनी वृक्ष लागवडीची मोहीमदेखील दोन-तीन दिवसापासून हाती घेतली आहे.
तळोदा तालुक्यातील गढवली व धडगाव तालुक्यातील निगदी या दोन गावांमधील वनअधिकार व्यवस्थापन व नियोजन समितीच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या सामुदायिक वनअधिकार प्राप्त जंगल जमिनीवर ३८ एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे काम शुक्रवारपासून हाती घेतले आहे. यात गढवली येथे २५ एकर तर निगदी येथे १२.५० एकर असे लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत विशेषत: गावातील तरूणांचा अधिक समावेश आहे.
गेल्या वर्षीदेखील गढवली गावात २५ एकर क्षेत्रावर गावकऱ्यांनी आंबा, बांबू, सीताफळ अशा विविध रोपांची लागवड केली होती. त्यातील ८५ टक्के रोपे आजही जीवंत असून, यामुळे गावाच्या वनसंपदेत एक प्रकारे भरच पडली आहे.
शिवाय गावातील अधिका-अधिक वनसंपदा वाढविण्याचा संकल्प या दोन्ही गावांमधील ग्रामसभांनी केला आहे. त्यांच्या या वृक्ष लागवड मोहिमेला लोक समन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन, प्रतिभा शिंदे, गणेश पराडके, मुकेश वळवी, नारायण पावरा, देविसिंग वसावे, निशांत मगरे यांच्या बरोबरच वनविभागाच्या अधिकाºयांचे सहकार्य मिळत असल्याचे गावकरी सांगतात.

गेल्या वर्षी वृक्ष लागवड मोहिमेला १ जुलैपासून तळोदा वनविभागाने सुरूवात केली होती. तथापि यंदा वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रात ९ जुलैपासून वृक्ष लागवड मोहिम सुरू केली आहे. दमदार पावसाअभावी मोहिम सुरु करण्यास विलंब झाल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. यंदा तळोदा मेवासी वनविभागाकडून तळोदा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, अशा वनपरीक्षेत्रात साधारण सव्वा तीन लाख वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे असले तरी यंदा आदिवासींना रोजगार देणाºया महुफुले व इतर प्रजातीची रोपे मुबलक प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

Web Title: Bamboo cultivation on 38 acres at Garhwali and Nigdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.