नंदुरबारातील विविध भागात जुन्या वृक्षांवर सर्रास कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:06 IST2020-09-10T11:06:00+5:302020-09-10T11:06:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अनेक ढेरदार आणि जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात ...

नंदुरबारातील विविध भागात जुन्या वृक्षांवर सर्रास कुºहाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील अनेक ढेरदार आणि जुनी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एक वृक्ष तोडण्याच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी वृक्षारोपण करणे आवश्यक असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषत: इमारत बांधकामाला अडचणीचे ठरणाºया ठिकाणी अशी वृक्षतोड झाली आहे. याबाबत पालिकेने मात्र उदासिनतेची भुमिका घेतली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नंदुरबार शहरातील अनेक भागात जुनी ढेरेदार वृक्ष आहेत. विशेषत: जुन्या वस्तीच्या भागात अशी वृक्षे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. शहरातील पर्यावरण टिकविण्यासाठी या वृक्षांचे मोठे योगदान असतांना अनेक बिल्डर, बांधकाम करणारे नागरिक यांनी आपल्या स्वार्थासाठी अशा वृक्षांची कत्तल केली आहे.
मुख्य चौकातील वृक्ष
शहरातील मुख्य चौकातील वृक्षांवर ही कुºहाड चालविण्यात आली आहे. त्यात माणिक चौक, परदेशीरा समोरील शेतकी संघाजवळील, हाट दरवाजा आदी ठिकाणी ही वृक्षतोड झाली आहे. एक वृक्ष तोडल्यास त्या बदल्यात दुसरे वृक्ष लावणे आवश्यक असते. तसा नियमच आहे. परंतु शहरातील या भागात झालेल्या वृक्षतोडीबाबत मात्र सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप होत आहे. संबधितांवर ना पालिकेने ना वन विभागाने कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे.
परवाणगी आवश्यक
पालिका हद्दीतील वृक्षतोड करावयाची असल्यास पालिकेकडे अर्ज करून रितसर परवाणगी घेणे आवश्यक असते. मोठी वृक्ष राहिल्यास पालिका वन विभागाकडून ना हरकत दाखला आणण्यास सांगत असते. त्यानंतरच वृक्षतोड करता येते. शहरात गेल्या वर्षभरात झालेल्या वृक्षतोड बाबत अशी कुठलीही परवाणगी घेतली गेली किंवा कशी याबाबत संदिग्धता आहे.
फाईल शोधावी लागेल...
पालिकेकडे देखील याबाबत अद्ययावत रेकॉर्ड नाही. ज्या कर्मचाºयाकडे याची जबाबदारी आहे त्या कर्मचाºयाने ‘फाईल कुठे ठेवली गेली ते शोधावे लागेल’ अशी बेजबाबदार उत्तरे दिली. त्यामुळे पालिकेचेही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येत आहे.
पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी
जुने व ढेरेदार वृक्ष सर्रास तोडले जात असतांना पाकिलेने देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. वन विभागाला देखील याबाबत थेट कारवाईचा अधिकार असतो. तोडलेल्या वृक्षाचे लाकूड कुठे गेले. कुठल्या सॉ मिलला ते विकण्यात आले. त्याची पावती आहे का? रितसर परवाणगी घेऊन ते लाकूड विकले गेले का? याबाबत वन विभागानेही देखील चौकशी करणे आवश्यक असतांना वन विभागाने देखील या सर्व प्रक्रियेकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आणि मार्गदर्शन आहे याबाबत शहरवासीयांमध्ये चर्चा सुरू आहे.