शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गृहभेटीद्वारे वाघोदा, राणीपूर व साबलापाणी येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

सारंगखेडा : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी प्रशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत ...

सारंगखेडा : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी प्रशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरू केले असून, गृहभेटीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.

शहादा तालुक्यातील वाघोदा, राणीपूर, साबलापाणी आदी गावांना भेट देऊन त्यांनी ‘माझे गाव, माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आढावा घेतला. दरम्यान, कर्मचाऱ्यांना लसीकरण वाढविण्यासंदर्भात सूचनाही दिल्या. ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला कोरोनामुक्त तालुका करायचा आहे व त्यासाठी आपण आरोग्य पथकाला सहकार्य करा व आरोग्य तपासणी करून त्यात ऑक्सिजन पातळी, थर्मल स्कॅनिंग मशीनने ताप तपासून घ्या. तसेच ४५ वर्ष वयोगटातील प्रत्येकानी लसीकरण करून घ्या, त्यापासून शारीरिक इजा किंवा त्रास होणार नाही. खोट्या अफवांना बळी पडू नका, आपले आरोग्य आपणच सांभाळा, लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून कोरोना चाचणी करून घ्या, आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका, विलगीकरण कक्षात दाखल व्हा. जेणेकरून इतरांना आपल्यापासून संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्या व प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी तालुक्यातील वाघोदा, राणीपूर व साबलापाणी आदी गावांना दिलेल्या भेटीवेळी केले. यावेळी वाघोदाचे सरपंच सुभाष भिल, उपसरपंच गोपाल भिल, माजी उपसरपंच वासुदेव पाटील, तलाठी लक्ष्मण कोळी, ग्रामसेवक गंगाधर बुधवंत, मुख्याध्यापक हसरथ मोरे, मंडल अधिकारी गवळे, वीरेंद्र पाटील, चेतन पाटील, रमाकांत पाटील, सोमनाथ पाटील, लखन पाटील, उत्तम ठाकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.