आमदार विकास निधीचा सरासरी ६५ टक्के निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:43+5:302021-02-06T04:57:43+5:30

नंदुरबार : लॅाकडाऊन व कोरोना यामुळे यंदा आमदार स्थानिक विकास निधी पूर्ण खर्च झाला नाही. जिल्ह्यातील चारही आमदारांचा साधारणत: ...

An average of 65% of the MLA development fund is spent | आमदार विकास निधीचा सरासरी ६५ टक्के निधी खर्च

आमदार विकास निधीचा सरासरी ६५ टक्के निधी खर्च

नंदुरबार : लॅाकडाऊन व कोरोना यामुळे यंदा आमदार स्थानिक विकास निधी पूर्ण खर्च झाला नाही. जिल्ह्यातील चारही आमदारांचा साधारणत: ६० ते ६५ टक्के निधी खर्च झाला आहे. मार्चअखेर पूर्ण निधी खर्च करण्यासाठी कसरत होणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपल्या आमदार निधीतील रक्कम कोरोना उपाययोजनांसाठीदेखील दिली होती. त्यात पालकमंत्री के.सी.पाडवी व शहादा-तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रत्येकी ५० लाखांचा निधी, नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावीत यांनी ४० लाखांचा तर नवापूरचे आमदार शिरिष नाईक यांनी २५ लाखांचा निधी जमा केला आहे.

जी रक्कम खर्च झाली नाही त्या रकमेच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले असून मार्चअखेर ती पूर्ण रक्कम खर्च होण्याची अपेक्षा जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी दिली.

Web Title: An average of 65% of the MLA development fund is spent