कापूस खरेदीच्या दिवशीच बंद पाडली लिलाव प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:20 IST2019-11-15T12:20:34+5:302019-11-15T12:20:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि आणि ढगाळ वातावरण कापूस उत्पादक शेतक:यांच्या जिवावर उठले आहे. कापूसमध्ये अपेक्षेपेक्षा ...

कापूस खरेदीच्या दिवशीच बंद पाडली लिलाव प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि आणि ढगाळ वातावरण कापूस उत्पादक शेतक:यांच्या जिवावर उठले आहे. कापूसमध्ये अपेक्षेपेक्षा अधीक ओल असल्यामुळे सीसीआयने कापूसभाव कमी देवू केल्याने शेतक:यांनी खरेदी शुभारंभाच्या दिवशीच लिलाव प्रक्रिया बंद पाडल्याचा प्रकार नंदुबारात घडला. दरम्यान, 18 ते 20 टक्के दरम्यान ओलावा असलेला कापूस किमान हमी भावाने खरेदी करावा अशी मागणी नंदुरबार बाजार समितीने जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
सीसीआयचा कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीच्या राजीव गांधी सुतगिरणी येथे गुरुवारी झाला. उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते कापूस गाडी आणि वजन काटा पूजन करून शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी कापूस भरून 70 वाहने दाखल झाली होती. परंतु एकाही वाहनातील कापूस लिलाव न होताच परत गेला.
12 टक्केच्या आत ओल हवी
कापसात किमान 12 टक्केच्या आत ओलावा हवा असतो, परंतु शेतक:यांनी आणलेल्या कापसात 18 टक्केपेक्षा जास्त ओलावा आढळून आला. त्यामुळे सीसीआय अर्थात भारतीय कपास निगमने हा कापूस कमी भावात अर्थात केवळ चार हजार ते चार हजार 200 रुपये भाव देवून खरेदी करण्याचा प्रय} केला.
याला शेतक:यांनी तीव्र विरोध केला. जो कापूस भाव जाहीर केला आहे त्यानुसारच भाव दिला गेला पाहिजे अशी मागणी शेतक:यांनी लावून धरली. परिणामी लिलाव होऊ शकला नाही.
बाजार समितीची मागणी
याबाबत बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 14 रोजी सीसीआय व बाजार समिती परवानाधारक कापूस खरेदीदार यांच्याद्वारे कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. परंतु मागील आठ ते दहा दिवसात तालुक्यात अवकाळी पाऊस आणि शेतातील कापूस ओला झाला आहे. सीसीआयच्या 12 टक्के र्पयत ओलावा या मापदंडात न बसल्यामुळे सीसीआयचे अधिकारी यांनी एकही वाहन शासनाच्या हमी भावाने खरेदी केले नाही.
बाजार समितीच्या खरेदीदार यांनी चार हजार ते चार हजार 200 रुपे भाव देऊ केल्याने शेतकरी संतापले. परिणामी लिलाव प्रक्रिया झाल नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि वातावरणातील आद्रता यामुळे शेतातील कापसाचे काढणीनंतर नैसर्गिकरित्या ओलावा 18 ते 20 टक्के दरम्यान असून भारतीय कपास निग ही केंद्र शासनाची किमान आधारभूत किंमतीने खरेदी करणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. त्यांनी निर्धारित केलेले मापदंड तात्काळ शिथील करून शेतक:यांचा 18 ते 20 टक्के दरम्यान ओलावा असलेला कापूस किमान हमी भावाने खरेदी करण्याचे आदेशीत करावे अशी मागणी या निवेदनात किशोर पाटील यांनी केली आहे.
घरातच कापूस पडून
शेतक:यांनी कापूस वेचणीनंतर तो घरातच भरून ठेवला आहे. सध्याचे आद्रतायुक्त वातावरण पहाता त्यात ओल दिसून येत आहे. परंतु ती 18 ते 20 टक्केर्पयत जात असल्याने कापसाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी शेतक:यांचा कापूस घरातच पडून आहे.
सीसीआयने किमान 5450 ते 5550 हा दर जाहीर केला आहे. त्यात बन्नी व ब्रम्हा कापसाला 5550 तर एच-4, एच-6, आरसीएच 2 या कापसाला 5450 रुपये दर आहे.
सीसीआयतर्फे किमान 12 टक्के ओलावा ग्राह्य धरला जातो. परंतु आज आलेल्या कापसात 18 ते 20 टक्के ओलावा असल्याचे व्यापा:यांचे म्हणने होते. त्यामुळे भाव कमी दिला जात होता.
यंदा कापूस खरेदी उशीराने झाली आहे. खेडा खरेदीतील व्यापारी फसवणूक करीत आहेत. त्यामुळे शेतक:यांचा कापूस अद्यापही घरातच भरून पडलेला आहे.