शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील गुजरातच्या टोकावर असलेल्या भवरे येथील राखीव जंगलात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील गुजरातच्या टोकावर असलेल्या भवरे येथील राखीव जंगलात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी पहाटे हाणून पाडण्यात आला. एकेरी नळीची गावठी बंदूक व लोखंडी भाला वनविभागाने जप्त केला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.सोमवारी पहाटे पाच वाजता नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना भवरे येथील राखीव वनक्षेत्रातील वनखंड क्रमांक ५० व ५१ मध्ये काही इसम शिकारीसाठी गेल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यावरुन खेकडा येथील वनपाल, वनरक्षक भवरे व वनमजूर यांना सोबत घेत मोटारसायकलीने भवरे येथे जाऊन त्यांनी जंगल गस्त करुन जंगलात शिकारीसाठी आलेल्या इसमांचा शोध घेतला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांना चार जण राखीव वनक्षेत्रात दिसून आले. वनकर्मचारी यांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्याकडील असलेले एकेरी नळीचे गावठी बंदूक व लोखंडी भाला टाकून ते पसार झाले. ते साहित्य वनकर्मचारी यांनी जप्त करुन वनरक्षक भवरे यांनी भारतीय वनअधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा एस.बी. केवटे, विभागीय वनअधिकारी धुळे दक्षता विभाग उमेश वावरे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ही कार्यवाही वनपाल प्रकाश मावची, वनरक्षक नितीन पाटील, वनमजूर अनिल गावीत, छगन सोनवणे, आंत्या गावीत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

मागील तीन ते चार वर्षापासून वनक्षेत्रात अथवा वनक्षेत्राबाहेर वन्यजीवांची एकदाही शिकार झालेली नाही. अवैध बंदूक बाळगणेबाबत संशयित आरोपींवर आर्मस अ‍ॅक्ट अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये तीन ते सात वर्षे कारावास व २५ लाखांच्या दंडाचे प्रावधान आहे. -गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, नंदुरबार.