शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा खून करुन ट्रकमधील मालविक्रीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरतकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा सहचालकाने गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुरतकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा सहचालकाने गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली़ खूनाच्या घटनेनंतर खून करणाºया सहचालकाने ट्रकमध्ये भरलेल्या सळया विक्री करण्यासाठी धुळ्यातील व्यापाऱ्यांसोबत संपर्क केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे़इंद्रदेव ओमप्रकाश यादव (२४) रा़ सुलतानपूर, उत्तरप्रदेश असे मयत चालकाचे नाव असून २२ डिसेंबर रोजी जालना येथून सळईने भरलेला ट्रक घेऊन तो सुरतकडे निघाला होता़ दरम्यान जळगाव जिल्ह्यातील मार्गावर त्याला सुरत येथे सोबतच काम करणारा मानसिंग पटेल रा़ उत्तरप्रदेश हा भेटला होता़ तेथून दोघेही सोबत धुळे मार्गाने सुरतकडे रवाना झाले होते़ परंतू ट्रक नवापुर तालुक्यात शिवारात आल्यानंतर मानसिंग पटेल याने इंद्रदेव यादव याचा गळा दाबून खून केला होता़ ट्रकमधील सळई विक्री करुन आर्थिक फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने मानसिंग याने हे कृत्य केले होते़ खूनाच्या घटनेनंतर त्याने ट्रकमधील सळईचा सौदा करण्यासाठी धुळे येथील एका भंगार व्यापाºयासोबत संपर्क केला होता़ परंतू सौदा होऊ शकला नाही यामुळे त्याने ट्रकमध्येच ठेवलेला इंद्रदेवचा मृतदेह मोरकारंजा शिवारातील नाल्यात फेकून दिला़ घटनेनंतर मानसिंग याने ट्रक सोनखांब शिवारात आणून एका हॉटेलसमोर उभा करुन पळ काढला होता़ याचदरम्यान ट्रान्सपोर्ट मालक सुनील गुप्ता यांनी ट्रकचा शोध घेत सोनखांब शिवारात आल्यानंतर खून आणि ट्रकचोरीचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला़याप्रकरणी सुनिल गिरधारीलाल गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानसिंग पटेल याच्याविरोधात विसरवाडी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे करत आहेत़ फरार मानसिंगचा पोलीसांकडून शोध सुरु आहे़