बँक खाते आधारशी त्वरीत जोडण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:47 PM2020-01-16T12:47:36+5:302020-01-16T12:47:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँक व इतर बँकांनी कर्जमुक्तीसाठी ...

Attempts to connect to a bank account base quickly | बँक खाते आधारशी त्वरीत जोडण्यासाठी प्रयत्न

बँक खाते आधारशी त्वरीत जोडण्यासाठी प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँक व इतर बँकांनी कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकº्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी जोडून आवश्यक प्रक्रीया त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित अधिकारी व बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक चांडक, जिल्हा अग्रणी बँक शाखा प्रमुख देशपांडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
डॉ. भारुड म्हणाले, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीनिहाय माहिती एकत्रित करावी. आधार नोंदणी झालेल्या शेतकºयांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी जोडावे. आधारलिंकींग न झालेले कर्ज खाते शेतकºयांनी त्वरीत आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे. ज्यांनी अद्याप आाधार कार्ड काढलेल नाहीत त्यांनी संबधित आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार कार्ड काढावेत व त्या बँकेच्या कर्ज खात्याशी आधारलिंक करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कर्जमुक्ती योजनेच्या विविध टप्प्यांची माहिती संबधित अधिकाºयांकडून उपस्थितांना देण्यात आली.

Web Title: Attempts to connect to a bank account base quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.