रशियातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:33 AM2020-06-07T11:33:27+5:302020-06-07T11:33:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पालकांनी ...

Attempts to bring students from Russia | रशियातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न

रशियातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पालकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री व पराराष्टÑ विभागाला पत्र देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हे रशियामध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेले आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सर्वत्र सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे पालक आपल्या पाल्यांना मायदेशी आणत आहेत. परदेशतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोना महामारी दरम्यान भारत सरकारमार्फत मायदेशी परत आणण्यात आले.
यापैकी नंदुरबार शहरातील तीन विद्यार्थ्यांना अजूनही परत आणण्यात आले नाही. सदर विद्यार्थी संबधीत देशाच्या राजदूत कार्यालयात नियमित पणे पाठपुरावा करत आहेत. तरीदेखील या विद्यार्थ्यांना अजूनही परत आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आलेली नाही.
आजच्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. पालकांनी खासदार डॉ.हिना गावीत यांनाही पत्र देवून लक्ष वेधले आहे.

Web Title: Attempts to bring students from Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.