धडगाव येथे एकास ठार मारण्याचा प्रयत्न, जमावाविरुद्ध गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Updated: May 6, 2023 17:59 IST2023-05-06T17:58:38+5:302023-05-06T17:59:32+5:30
पोलिस सूत्रांनुसार, धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूकच्या बेवडदपाडा येथील शांतिलाल कागडा तडवी हे घराचे बांधकाम करीत आहेत.

धडगाव येथे एकास ठार मारण्याचा प्रयत्न, जमावाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार : घराच्या बांधकामाच्या ठिकाणी मुरूम टाकण्याच्या वादातून चार ते पाच जणांनी एकावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धडगाव येथे घडली. याबाबत धडगाव पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूकच्या बेवडदपाडा येथील शांतिलाल कागडा तडवी हे घराचे बांधकाम करीत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी मुरूम टाकला होता. त्यावरून अशोक बिंद्या तडवी व शांतिलाल यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. अशोक बिंद्या तडवी (३८) यांनी धारधार शस्त्राने वार केला. त्यात शांतिलाल यांच्या पोटावर, छातीवर, गालावर गंभीर जखमा झाल्या. इतरांनीदेखील त्यांस बेदम मारहाण केली. याबाबत शांतिलाल कागडा तडवी यांनी फिर्याद दिल्याने अशोक बिंद्या तडवी (३८), वांगल्या जुगला तडवी (३६), प्रदीप बिंद्या तडवी (३३) व इतर तीन जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण महाले करीत आहेत.