अंधश्रद्धेतून महिलेची नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न, पतीलाही मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:44 IST2019-03-07T04:44:19+5:302019-03-07T04:44:25+5:30

डाकीण असल्याच्या संशयातून ३५ वर्षीय महिला आणि तिच्या पतीस जमावाने बेदम मारहाण करून नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना गौऱ्याचा खावल्यापाडा, ता. धडगाव येथे घडली.

An attempt to remove the woman's nakedness from superstition, her husband also hit | अंधश्रद्धेतून महिलेची नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न, पतीलाही मारहाण

अंधश्रद्धेतून महिलेची नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न, पतीलाही मारहाण

नंदुरबार : डाकीण असल्याच्या संशयातून ३५ वर्षीय महिला आणि तिच्या पतीस जमावाने बेदम मारहाण करून नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना गौऱ्याचा खावल्यापाडा, ता. धडगाव येथे घडली. या प्रकरणी बुधवारी पाच जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौऱ्याचा खावल्यापाडा येथील नाया बारका पराडके यांच्या मुलीस गावातीलच ३५ वर्षीय महिलेने तंत्रमंत्र करून व काहीतरी पदार्थ खाऊ घालून आजारी पाडल्याचा आरोप पराडके व त्यांच्या नातेवाइकांनी केला. महिला डाकीण असल्याच्या अंधश्रद्धेतून नाया बारका पराडके, दारासिंग नाया पराडके, दाबक्या बारज्या पराडके, सोमीबाई नाया पराडके व लोंगीबाई नाया पराडके यांनी महिलेला व पतीला घरात घुसून मारहाण केली.
जमावाने महिलेला विवस्त्र करण्याचा, तसेच गावातून नग्न धिंड काढण्याचाही प्रयत्न केला. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडितेने महिलेने दिली. त्यावरून पाचही जणांविरुद्ध महाराष्टÑ नरबळी व इतर अमानुष अघोरी विद्या प्रतिबंध कायदा, विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात अक्कलकुवा तालुक्यातही महिलेला डाकीण असल्याचा संशयावरून मारहाण करण्यात आली होती.

Web Title: An attempt to remove the woman's nakedness from superstition, her husband also hit