शहाद्यात भर दिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:57 IST2018-06-18T12:57:08+5:302018-06-18T12:57:08+5:30

तिस:यांदा प्रकार : तीन लाख लंपास, भितीचे वातावरण

Astrology is a day of casualties | शहाद्यात भर दिवसा घरफोडी

शहाद्यात भर दिवसा घरफोडी

शहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील दशरथ नगर मधील रविंद्र अहिरे यांच्या घरी भर दिवसा घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरटय़ांनी  तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सायंकाळी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
     पोलीस सूत्रांनुसार, दोंडाईचा रोडवरील फॉरेस्ट ऑफीस समोरील दशरथ नगरमध्ये रविंद्र सुखदेव अहिरे प्राथमिक शिक्षक आपल्या कुटुंबासह  राहतात . रविंद्र अहिरे यांची पतपेढीची मिटींग होती व दुपारुन मित्राकडे जेवण असल्याने कुटुंबासह ते मित्राकडे गेले होते. मुलगा घरीच होता तो दुपारी 12 वाजेचा सुमारास घरातुन बाहेर पडला. दोन वाजता अहिरे कुटुंब घरी आले असता त्याना   घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेल्या अवस्थेत दिसला. चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले.  
कपाटात ठेवलेली रोख एक लाख 80 हजार व दीड लाख रुपये किंमतीच्या पाच तोळे सोन्याचा बांगड्या चोरटय़ांनी लंपास केल्या. चोरटय़ांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला घराचा आतुन दरवाजा लावुन घेतला व मागच्या दाराने पसार झाले व मागचा दाराची कडी देखील बाहेरुन लावली. अहिरे दाम्पत्याने मुलाच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दीड लाख रुपये आणले होते. सोमवारी ते शुल्क भरण्यासाठी जाणार होते. रविंद्र अहिरे यांच्याकडे चोरीची ही तिसरी घटना आहे. सायंकाळी उशीरापयर्ंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.     

Web Title: Astrology is a day of casualties