सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:02 IST2019-11-18T13:01:47+5:302019-11-18T13:02:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यातील शेतशिवार आणि वनांमध्ये उत्पादित होणा:या सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती निर्माण झाली आह़े ...

सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यातील शेतशिवार आणि वनांमध्ये उत्पादित होणा:या सिताफळांचा हंगाम यंदा ओसल्याची स्थिती निर्माण झाली आह़े अवकाळी पावसामुळे झाडावरचे फळ गळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े
धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागातील झाडांवर येणारे सिताफळ हे चवदार असल्याने जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमध्येही त्याला मोठी मागणी आह़े यातून धडगाव तालुक्यात उत्पादित होणा:या सिताफळाला सर्वाधिक मागणी असत़े मांडवी, काकर्दे व धडगाव परिसरात सिताफळ एकत्र करुन विक्री करण्यासाठी तळोदा येथे आणले जातात़ यातून तळोदा हे सिताफळाचे मार्केट झाले आह़े परंतू यंदा या मार्केटला घरघर लागल्याचे चित्र असून दिवाळीनंतर अवघ्या 15 दिवसातच सिताफळाचा हंगाम ओसल्याची स्थिती आह़े धडगाव तालुक्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम हा सिताफळावर झाला आह़े यातून अनेक ठिकाणी फळे जमिनीवर पडून नष्ट झाली होती़ हीच स्थिती अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागातही दिसून येत आह़े सिताफळाच्या माध्यमातून मिळणा:या रोजगारावर परिणाम झाला आह़े झाडांवर ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या रोगातून सिताफळांचा कडकपणा जाऊन ते आतून नरम होऊन लाल झाल्याचे दिसून आले होत़े या प्रकारामुळे आदिवासी शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात येत आह़े धडगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या सिताफळांच्या झाडांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक:यांची आह़े अवकाळी पावसाचे पंचनामे करणा:या पथकांनाही याबाबत आदिवासी शेतक:यांनी सूचना केल्या होत्या़ परंतू पथकांना केवळ पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश असल्याने त्यांनी नकार दिल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाने शेतक:यांच्या मालकीच्या फळझाडांची माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी आह़े