राज्यात सर्वाधिक घरकुल जिल्ह्यात मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:56 IST2019-11-19T11:56:30+5:302019-11-19T11:56:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येकाला स्वत:चे आवास हा त्याचा हक्क आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले आहे. ...

राज्यात सर्वाधिक घरकुल जिल्ह्यात मंजुर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रत्येकाला स्वत:चे आवास हा त्याचा हक्क आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले आहे. त्यामुळे लवकरच सर्व लाभाथ्र्याचे स्वप्न पुर्ण होईल, राज्यात सर्वाधिक घरकुलं नंदुरबार जिल्ह्यात मंजुर असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी आवास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना दिली.
पंचायत समिती सभागृहात आवास दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, गटविकास अधिकारी अशोक पटाईत उपस्थित होते.
यावेळी वेळेवर घरकुल पुर्ण करणा:या लाभाथ्र्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शिवाय घरकुल मंजुरीचे आदेश देखील वाटप करण्यात आले. खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वाच्या सहकार्याने प्रभावीणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरकुल मंजुर झाली आहे. घरकुल मंजुर परंतु जागा नाही अशी स्थिती काही ठिकाणी आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या योजनेतून जागेसाठी 50 हजार रुपये दिले जातात. योजनेची माहिती लाभाथ्र्याना दिली पाहिजे.
मयत लाभार्थीच्या वारसदारास घरकुलसाठी प्रस्ताव पाठवून वारसदाराचे नाव जोडण्याचे काम जिल्हा परिषद स्तरावर होणार आहे. ब यादी पुर्ण झाल्यानंतर ड यादीतील लाभाथ्र्याना घरकुले मिळणार आहेत. प्रत्येक बेघर व्यक्तीला या योजनेसोबत इतर योजनेतून घरकुल मिळवून दिले जाणार आहे. 79 हजार घरकुले मंजुर झाली आहे. ड यादीत जवळपास दोन लाख लोकांची नावे आहेत. ते मंजुरीसाठी पाठविली आहेत. घरकुलाबाबत काहीही तक्रार असल्यास हेल्पलाईनशी संपर्क साधावा. तसेच घरकुल ज्या ठिकाणी जागा निर्धारित केली आहे त्याच ठिकाणी बांधावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी योजनेची माहिती सांगितली. प्रकल्प संचालक सोनवणे यांनी एकुण योजना आणि त्यातील टप्पे याची माहिती दिली.
सूत्रसंचलन विस्तार अधिकारी बी.डी.निकुंभे यांनी केले. आभार दिनेश वळवी यांनी मानले. यावेळी ग्रामिण भागातून नागरिक मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.