Vidhan Sabha 2019: दुस:या प्रशिक्षणालाही 48 कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:32 IST2019-10-13T12:32:36+5:302019-10-13T12:32:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदानासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण नंदुरबारात झाले. या प्रशिक्षणाला देखील तब्बल 48 कर्मचारी गैरहजर ...

Vidhan Sabha 2019: दुस:या प्रशिक्षणालाही 48 कर्मचारी गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मतदानासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण नंदुरबारात झाले. या प्रशिक्षणाला देखील तब्बल 48 कर्मचारी गैरहजर होते. पहिल्या प्रशिक्षणाला गैरहजर कर्मचा:यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आता या प्रशिक्षणाला गैरहजर राहणा:या कर्मचा:यांवर थेट कारवाईचे निर्देश देण्यात येणार आहेत.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीरात दुपारी झाले. या प्रशिक्षणाला नियुक्त कर्मचा:यांपैकी एकुण 48 कर्मचारी गैरहजर होते. यात मतदान केंद्राध्यक्ष 14, इतर मतदान अधिकारी 26 तर आठ सहायक मतदान अधिकारी यांचा समावेश आहे. पहिल्या प्रशिक्षणाला देखील 40 पेक्षा अधीक कर्मचारी गैरहजर होते. त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कर्मचा:यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील यांनी प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी थोरात, उल्हास देवरे, अशोक पटाईत उपस्थित होते. पीपीटीचे काम संदीप वाडीले यांनी पाहिले. कर्मचा:यांनी यावेळी विविध शंका उपस्थित केल्या. त्यांना निवडणूक निर्णय अधिका:यांनी समर्पक उत्तरे देवून शंका निरसन केले.