पाण्याअभावी ऊस करपला तर केळीवर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:05 IST2019-06-23T13:05:16+5:302019-06-23T13:05:20+5:30

गुलाबसिंग गिरासे ।  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोड शिवारात उसाच्या बियाण्यासाठी लावलेला ऊस पाण्याअभावी करपल्याने शेतक:याला ...

Ankur rotates on the banana if it is unable to get water | पाण्याअभावी ऊस करपला तर केळीवर फिरवला नांगर

पाण्याअभावी ऊस करपला तर केळीवर फिरवला नांगर

गुलाबसिंग गिरासे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड शिवारात उसाच्या बियाण्यासाठी लावलेला ऊस पाण्याअभावी करपल्याने शेतक:याला प्रचंड नुकसान सहन करावे लागले तर कळमसरे शिवारातही पाण्याची पातळी खोल गेल्याने एका शेतक:यावर केळीच्या उभ्या झाडांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. पजर्न्यमानाची स्थिती दरवर्षी अशीच राहिली तर सुजलाम् सुफलाम् असलेल्या या परिसरातील शेतक:यांवर मोठे संकट येणार आहे.
तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी प्रवीण रमण नवले यांनी आपल्या मोड शिवारातील पाच एकर क्षेत्रात बियाण्यासाठी उसाची लागवड केली होती. कर्नाल 238 या जातीच्या उसाची बियाण्यासाठी त्यांनी जुलै 2018 मध्ये लागवड केली होती. जास्त उत्पन्न देणारी ही उसाची जात असल्याने परिसरातील शेतक:यांनाही त्याचा लाभ होईल म्हणून नवले यांनी पाच एकर क्षेत्रात लागवड केली. हे बियाणे तयार झाल्यानंतर शेतक:यांना विकून उर्वरित बियाणे स्वत:च्या शेतात लागवड करण्याचे नियोजन नवले यांनी केले होते. परंतु मागीलवर्षी पाऊस कमी झाल्याने या परिसरातील पाण्याची पातळी कधी नव्हे एवढी खोल गेली आहे. त्यातच नवले यांच्या शेतातील कूपनलिकाही आटली. त्यामुळे उसाची वाढ खुंटून हे बियाण्यासाठी लावलेले उसाचे पीक अक्षरश:                करपत आहेत. तापमानाची स्थिती अशी राहिली व पाऊस लांबला तर उसाचे बियाणे या शेतक:याला काढून फेकावे लागणार आहे. या पिकासाठी त्यांना आतार्पयत एकरी 32 हजार रुपये खर्च आला आहे. पाण्याअभावी उसाचे पीक वाया जाणार असल्याने या शेतक:यांला आर्थिक नुकसानीचा फटका बसणार  आहे.
कळमसरे, ता.तळोदा शिवारातील केळी उत्पादक शेतकरी भगवान गोविंद लोहार यांनी आपल्या शेतात केळी पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील केळीच्या झाडांची साडेतीन ते चार फुटार्पयत वाढ झाल्यानंतर कुपनलिका आटली. वाढते तापमान व केळी पिकाला पुरेसे पाणी न               मिळाल्याने झाडांची वाढ खुंटून ते कमजोर झाल्याने शेवटी लोहार यांच्यावर           केळीच्या झाडांवर नांगर फिरविण्याची वेळ आली. ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर मारून या शेतक:याला केळीचे पीक नेस्तनाबूत करावे लागले. लोहार यांचाही केळी पिकासाठी एकरी 27 हजार रुपये खर्च झाल्याने त्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
पावसाची स्थिती जर दरवर्षी अशीच राहिली तर आतार्पयत शेतीच्या बाबतीत सुजलाम् सुफलाम् म्हणून ओळखल्या जाणा:या या परिसरातील शेतक:यांवर मोठे संकट कोसळण्याची भीती जाणकार शेतक:यांकडून व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्यातील मोड व बोरद परिसरातील शेतक:यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार केळी, ऊस, पपई आदी महागडय़ा पिकांची लागवड केली. मात्र यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याची पातळी झपाटय़ाने खोल गेली. परिणामी शेतक:यांना छातीवर दगड ठेवून या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. यंदा पडलेला दुष्काळ व त्यातच पाण्याअभावी पिके नष्ट होत असल्याने या पिकांसाठी केलेला खर्च वाया जात आहे. परिणामी शेतक:यांवर कजर्बाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने या नुकसानीची दखल घेऊन या परिसरातील शेतक:यांना आर्थिक मदतीसाठी प्रय} करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Ankur rotates on the banana if it is unable to get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.