अंगणवाडी कर्मचारी विमा योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:26 IST2020-01-02T12:23:03+5:302020-01-02T12:26:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या विमा योजनांचा लाभ देण्यात यावा, असे आदेश ५ जुलै २०१८ ...

 Anganwadi employees deprived of insurance plan | अंगणवाडी कर्मचारी विमा योजनेपासून वंचित

अंगणवाडी कर्मचारी विमा योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या विमा योजनांचा लाभ देण्यात यावा, असे आदेश ५ जुलै २०१८ रोजी मध्यवर्ती शासनामार्फत देण्यात आला होता. परंतु आजपर्यंत या योजनेसाठी शासनाने कुठलीच कार्यवाही केली नाही. या योजनेला गती द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
प्रलंबित मागण्यासाठी अक्कलकुवा येथे संघटनेची बैठक घेण्यात आली. बैठकीत विद्या मोरे, इंदिरा पाडवी, पूजा राऊत, मिना तडवी, शोभा वळवी, युवराज बैसाणे आदी उपस्थित होते. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तर प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. निवेदनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम साडेचारऐवजी आठ तास करीत शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन व भत्ते द्यावे, हरियाणा व तेलंगाणा राज्यांप्रमाणे मानधन लागू करावे, अंगणवाडी कर्मचाºयांना मानधनाच्या निम्मे रक्कम पेंशन म्हणून द्यावी, अंगणवाडी केंद्रांना सुधारीत घरभाडे द्यावे, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ता विमा योजनेचे लाभ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी कर्मचाºयांना द्यावे, आॅक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीतील मानधनवाढीच्या फरकाची थकीत रक्कम विनाविलंब द्यावी, रिक्त जागा भरण्यासाठी लावलेले निर्बंध उठवावे, दुर्गम व आदिवासी प्रकल्पात काम करणाºया कर्मचाºयांना जून २०१७ पासून अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता लागु करीत थकीत रक्कम द्यावी, मिनी अंगणवाड्यांचे नियमित अंगणवाडीत रुपांतर करावे, मयत तथा सेवा समाप्त झालेल्या कर्मचाºयांना सेवा समाप्तीचा लाभ द्यावा, वाढीव दराप्रमाणे मोबाईल खर्च द्यावा यासह अन्य प्रलंबित मागण्या करण्यात आल्या आहे. निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, सुधील परमेश्वर, अमोल बैसाणे, रामकृष्ण पाटील, अ‍ॅड.गजानन थळे यांच्या सह्या आहेत.

Web Title:  Anganwadi employees deprived of insurance plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.