अन् भावाने केला लहान भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 19:01 IST2017-08-17T18:42:42+5:302017-08-17T19:01:29+5:30

बेबडदपाडा येथे वेडाच्या भरात मोठ्या भावाने केला लहान भावाचा कुºहाडीने खून. या घटनेनंतर धडगाव पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

And brother made little brother's blood | अन् भावाने केला लहान भावाचा खून

अन् भावाने केला लहान भावाचा खून

ठळक मुद्देधडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूक जवळील बेबडदपाडा येथील घटनासंशयित आरोपी चुंड्या तडवी याची मानसिक स्थिती खराबमयत शिवण्या तडवी हा झोपलेला असताना संशयिताने केला कुºहाडीने वारपोलिसांनी संशयित आरोपी चुंड्या याला ताब्यात घेतले आहे.

आॅनलाईन लोकमत 
नंदुरबार,दि.१७ - वेडाच्या भरात मोठ्या भावाने शिवण्या मोग्या तडवी (वय-२४) या लहान भावावर कुºहाडीने वार करून जागीच ठार केल्याची घटना धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूकचा बेबडदपाडा येथे १६ रोजी रात्री घडली. याप्रकरणी धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, बेबडदपाडा येथील चुंड्या मोग्या तडवी यांची मानसिक स्थिती खराब आहे. त्या भरातच त्यांनी आपला भाऊ शिवण्या मोग्या तडवी याच्यावर कुºहाडीने वार केला. शिवण्या हा झोपलेला होता. ती संधी साधून त्याने त्याच्या मानेवर कुºहाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
वडिल मोग्या डुकल्या तडवी यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलविले. त्यानंतर धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने चुंड्या मोग्या तडवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंड्या यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: And brother made little brother's blood