मराठा क्रांती मोर्चातर्फे आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:51 IST2020-10-11T12:51:50+5:302020-10-11T12:51:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने आणि आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिल्याने मराठा ...

मराठा क्रांती मोर्चातर्फे आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने आणि आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिल्याने मराठा क्रांतीमोर्चातर्फे शनिवाराचे रास्ता रोको रद्द करून त्याऐवजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविणेबाबत ठोस निर्णय घेणे, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे व मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाने वरील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. तसेच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करुन येथील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज नंदुरबार जिल्ह्याच्यावतीने जगताप वाडी चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन फटाके फोडण्यात आले. तसेच पेढे वाटून आंदोत्सव साजरा करण्यात आला. व सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
तसेच आज रविवार रोजी डी.आर.हायस्कुल जवळ होणारे एमपीएससी परीक्षा बंद आंदोलन ही मागे घेण्यात आले. आंदोलन जरी स्थगित करुन मागे घेण्यात आले असले तरी मराठा समाजाचे आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती पुर्णत: उठवून आरक्षणाचा लाभ समाजातील विद्यार्थी व युवकांना मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा लढा हा अखेरपर्यंत सुरु राहील. मराठा आरक्षणाची पुढील आंदोलनाची दिशा राज्यस्तरीय समिती मार्फत पुढील काळात आक्रमक स्वरुपात करण्यात येईल. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. आज रोजी सकल मराठा समाजातील सर्व समाज बांधव व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.