अमोनी गट-गण ठरला ‘लकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:42 PM2020-01-19T12:42:18+5:302020-01-19T12:42:23+5:30

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता अध्यक्षपद व पंचायत समितीेचे सभापती आणि ...

The Ammonite group became 'Lucky' | अमोनी गट-गण ठरला ‘लकी’

अमोनी गट-गण ठरला ‘लकी’

Next

वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता अध्यक्षपद व पंचायत समितीेचे सभापती आणि उपसभापती अशा प्रमुख पदांचा मान तालुक्यातील अमोनी गटास योगा-योगाने जुळून आला आहे. साहजिकच हा गट जिल्ह्यात लकी ठरला असून, त्या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषदेच्या तळोदा तालुक्यातील अमोनी गट अतिदुर्गम म्हणून ओळखला जात असतो. कारण या गटास सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावे-पाड्यांचा समावेश आहे. साहजिकच गटाचे क्षेत्रफळदेखील मोठे आहे. तथापि रोजकीय दृष्ट्या हा गट अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे. या गटास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मानदेखील मिळाला आहे. पूर्वी या गटाच्या सदस्या मंगलाबाई जर्मनसिंग वळवी यांच्या रूपाने पहिल्यांना जिल्हा परिषदेचे सभापतीपद मिळाले होते. त्यानंतर गेल्या वेळेस नेतृत्व करणारे सुहास नाईक यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. यंदा तर हा गट अधिकच नसीबवान ठरून तालुका पंचायत समितीबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदेखील मिळाले आहे. कारण गटाचे नेतृत्व करणाºया तरूण सुशीक्षित सदस्या अ‍ॅड.सीमा पद्माकर वळवी या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. पंचायत समितीच्या नूतन पदाधिकारी पदीही याच गटातील दोघ गणांमधील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती यशवंत ठाकरे हे अमोणी गणाचे नेतृत्व करतात तर उपसभापती लताबाई अर्जुन वळवी अंमलपाडा गणाचे नेतृत्व करीत असतात. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी म्हणून अमोनी गटास छप्पर फाडके दान मिळाल्याने निश्चित अमोनीगट चर्चेत आला आहे. तथापि विकासाच्या बाबतीत हा गट कोसो दूर असल्याचे चित्र आहे. कारण प्रश्नही गेल्या वर्षी गाजला होता. आता ग्रामीण विकासाची जिल्हा परिषदेत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने विकासाबाबत येथील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून गेल्या २० वर्षाच्या कालावधीत प्रथमच तापी पलिकडील भागाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. कारण आजतागायत नंदुरबार व नवापूर या दोन तालुक्यांनाच आलटून पालटून नेतृत्वाची संधी मिळाली होती. या वेळेस तळोद्यासह अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळावा, अशी मागणी जोर धरत होती. तसा आग्रह सदस्यांचादेखील होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना ही सदस्यांची ही मागणी मान्य करायला भाग पडली. साहजिकच माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची कन्या अ‍ॅड.सीमा वळवी यांचे नाव पुढे येवून त्यांची जिल्हा परिषदेच्या अधञयक्षपदी वर्णी लागली. जिल्हा परिषदेची सत्ता तरूण नेतृत्वाच्या हाती सोपविण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच तरूणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय अध्यक्षपद तळोदा, धडगाव, अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागाकडे आल्याने निश्चितच या भागातील विकासाचा मोठा अनुशेष भरुन निवडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The Ammonite group became 'Lucky'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.