बालकाचे अपहरण केल्याचा आरोप, नंदुरबारमध्ये दोघांवर गुन्हा
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: September 27, 2023 19:14 IST2023-09-27T19:14:19+5:302023-09-27T19:14:27+5:30
मोलगी पोलिसात गुन्हा दाखल

बालकाचे अपहरण केल्याचा आरोप, नंदुरबारमध्ये दोघांवर गुन्हा
रमाकांत पाटील/नंदुरबार: चोरी केल्याच्या संशयावरून १४ वर्षीय बालकाचे अपहरण केल्याचा आरोप करीत दोघांविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहेलचा करसखाडीपाडा, ता. अक्कलकुवा येथे ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनुसार, देहलेचा करसखाडीपाडा येथे चोरी झाली होती. याप्रकरणात २१ सप्टेंबर रोजी गावातील एका १४ वर्षीय बालकावर चोरीचा आरोप गावातीलच दोघांनी केला होता. त्यानंतर बालक बेपत्ता झाला होता. त्याचा ठिकठिकाणी शोध घेेतला असता मिळून आला नाही. त्यामुळे त्याचे जयसिंग विज्या वसावे व रमेश विज्या वसावे यांनी अपहरण केल्याचा संशय मुलाच्या वडिलांनी केला. त्यावरून दोघांविरुद्ध मोलगी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मुकेश पवार करीत आहेत.