एमएडीसीकडून विमानतळ विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:04 PM2020-01-23T13:04:49+5:302020-01-23T13:04:55+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विमानतळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तहसीलदारांना जागा उपलब्ध ...

Airport Development from MADC | एमएडीसीकडून विमानतळ विकास

एमएडीसीकडून विमानतळ विकास

googlenewsNext

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विमानतळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तहसीलदारांना जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सुचीत केले आहे. २४ रोजी होणाºया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न चर्चेला येणार आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून विमानतळासाठीच्या जागेचे भिजत घोंगडे कायम आहे. महाराष्टÑ विमानतळ विकास कंपनी अर्थात ‘एमएडीसी’ हे काम करणार आहे. यापूर्वी देखील दोनवेळा जागा शोधण्याचा प्रयत्न झाला, मात्र अधिकारी बदलले की सर्वच बदलते त्याचा अनुभव दोनवेळा आला आहे.
प्रत्येक महानगर व मोठी शहरे ही विमानमार्गाने जोडले जावे यासाठी शासनचे धोरण आहे. त्या अनुषंगाने अनेक मोठ्या शहरांमध्ये विमानतळ निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नंदुरबार देखील या शहरांच्या रांगेत आहे. परंतु जागेच्या अभाव किंवा जागा निश्चिती नसल्यामुळे ही प्रक्रिया मागे पडल्याचे दिसून येत आहे. आता मात्र जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुन्हा विमानतळाचा विषय ऐरणीवर आला आहे.
चार वर्षांपूर्वी जागा पहाणी...
चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी हा मुद्दा पुढे आणला होता. स्थानिक मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांनी विमानतळ मंजुरीसाठीचे प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन तहसीलदार यांनी रनाळे भागात शासकीय जागेसंदर्भातील प्रस्ताव दिला होता. रनाळे, वनकुटे, ढंढाणे या परिसरात विमानतळासाठीची पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नंतर ती जागा वन विभागाची आणि टेकड्यांची ऊंच-सखल असल्यामुळे ती जागा मिळणे अशक्य तसेच खर्चीक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तो प्रस्ताव रखडला होता.
त्यानंतर तालुक्यातील परंतु गुजरात हद्दलगतच्या जागेचा मुद्दा पुढे आला, परंतु विमानतळाला आवश्यक असणारी एवढीमोठी शासकीय जागा एकाच ठिकाणी मिळणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यावेळी देखील तो प्रस्ताव थंड बस्त्यात पडला.
एमएडीसी विकास करणार
राज्यातील मोठ्या शहरांमधील विमानतळ उभारण्यासाठी एमएडीसी अर्थात महाराष्टÑ विमानतळ विकास कंपनी ही राज्य शासनाच्या अख्त्यारीतील समिती पुढाकार घेणार आहे. त्यांच्या माध्यमातूनच विमानतळ विकास होणार आहे. त्यासाठी प्राथमिक निधीची आणि जागेची तरतूद ही त्या त्या जिल्ह्यांना करावी लागणार आहे. अर्थात त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे. इतर विकास हा विमानतळ विकास कंपनी करणार आहे. या कंपनीचे पदसिद्ध अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. तर आयएएस दर्जाचे दोन अधिकारी आणि राज्य सेवेतील चार अधिकारी या कंपनीचे मुख्य काम पहातात.
राज्य नियोजन मंडळ
बैठकीत मंजुरी?
जिल्हा नियोजन मंडळांच्या बैठका २६ जानेवारीच्या घेवून त्यातील प्रस्ताव हे राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजुर करून घेण्यात येणार आहेत. यावेळी ही बैठक नाशिक येथे ३० जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळासाठी तातडीने शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तहसीलदारांना सुचित केले असल्याचे समजते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिव डॉ.राजेंद्र भारूड यांनी नंदुरबारातील १० ते १५ कि.मी.परिसरात शासकीय जागा उपलब्ध करून घेत २३ जानेवारीपर्यंत सातबारा उताºयासह प्रस्ताव सादर करावा अशा सुचना दिल्या आहेत.

जिल्ह्यालगत असलेल्या धुळे व शिरपूर येथील विमानतळांचे अंतर अनुक्रमे १०० व ६० इतके आहे. त्यामुळे धुळे किंवा शिरपूर येथे व्हीआयपी व्यक्ती विमानाने येवून त्यांना पुन्हा हेलिकॉप्टरने नंदुरबारात यावे लागते. किंवा रस्ता वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे तो वेळ वाचण्यासाठी हा प्रयत्न आहे.

नंदुरबार जिल्हालगत असलेल्या सर्वच जिल्ह्याच्या मुख्यालयी अर्थात उत्तर महाराष्टÑातील सर्वच जिल्हा मुख्यालयाच्या शहरात विमानतळ आहे. त्यात धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर यांचा समावेश करता येईल. परंतु नंदुरबार शहर व जिल्हा त्यापासून वंचीत आहे. जर नंदुरबारातही विमानतळ झाले तर उत्तर महाराष्टÑातील सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नंदुरबारसाठी खास प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तशा सुचनाही महाराष्टÑ विमानतळ विकास समितीने केल्या आहेत.

Web Title: Airport Development from MADC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.