उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाचा शेतीशाळा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:07 IST2019-06-16T12:07:41+5:302019-06-16T12:07:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यास सेंद्रीय शेतीची जोड देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने यंदापासून ...

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाचा शेतीशाळा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यास सेंद्रीय शेतीची जोड देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने यंदापासून शेतीशाळा हा उपक्रम हाती घेतला असून, तळोदा तालुक्यात 21 गावांना या शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गणेश बुधावल येथील शेतक:यांना या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतक:यांच्या उत्पादनावर होणारा प्रचंड खर्च कमी करून त्यांना अधिक उत्पादनाबरोबरच सेंद्रीय शेतीची जोड व्हावी यासाठी संपूर्ण राज्यात यंदा शेतीशाळा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमातून प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून शेतक:यांना पीक व कीड व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहे. तळोदा तालुक्यातील कोठार, गणेश बुधावल, सोमावल नर्मदानगर, ङिारी, सरदारनगर, खुषगव्हाण, सेलवाई, रांझणी, रेवानगर, गोपाळपूर पुनर्वसन, रापापूर, बोरद, लाखापूर (फॉ), धनपूर, धानोरा, त:हावद, दलेलपूर या गावांची येथील कृषी विभागाने निवड केली आहे. या शेतीशाळेसाठी प्रत्येक गावातील 25 शेतक:यांचा गट तयार करण्यात आला आहे. ऊस, कापूस, मका, सोयाबीन, तूर ही पिके या कार्यक्रमासाठी घेण्यात आली आहे.
शेती क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून शेतक:यांना शेती शाळेचे नियोजन, पीक प्रात्यक्षिक, नांगरटीपासून तर पीक काढणीर्पयत मार्गदर्शन करणार आहेत. अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन यावर प्रमुख भर राहणार आहे. वर्षभरात एकूण आठ मार्गदर्शन वर्ग प्रत्येक गावात घेण्यात येतील. त्यात उसासाठी दोन, कापूस 12, मुंग दोन, सोयाबीन दोन, तूर एक अशा एकूण 19 शेती शाळा घेण्यात येणार आहेत. 15 दिवसांच्या कालावधीमध्ये एक मार्गदर्शन वर्ग घेण्यात येईल. कृषी विभागाच्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी येथील कृषी कार्यालयाकडून हाती घेण्यात आली असून, तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथील शेतक:यांना तीन दिवसांपूर्वीच मार्गदर्शन करण्यात आले आहे. पिकांबाबत अधिका:यांकडून सखोल मार्गदर्शन मिळत असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. साधारण 25 शेतक:यांच्या गटाची मर्यादा असली तरी मोठय़ा प्रमाणात शेतकरी मार्गदर्शन वर्गात उत्साहाने सहभागी होत असल्याचे तळोदा कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
शेती शाळेच्या कार्यक्रमासाठी कृषी विभागाने अनुदानदेखील उपलब्ध करून दिल आहे. प्रत्येक शाळेसाठी साधारण 14 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानातून तालुका कृषी प्रशासनाने सहभागी शेतक:यांना अल्पोपहार, कीडरोग व्यवस्थापन माहिती पुस्तिका व इतर सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. याशिवाय बाहेरील कृषी तज्ज्ञाचे मानधनही द्यायचे आहे.