नंदुरबार व नवापूरात दहानंतर मतदानासाठी गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:45 IST2017-12-13T12:44:11+5:302017-12-13T12:45:31+5:30

After trekking in Nandurbar and Navapura, there was a rush for the voting | नंदुरबार व नवापूरात दहानंतर मतदानासाठी गर्दी वाढली

नंदुरबार व नवापूरात दहानंतर मतदानासाठी गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी संथ गतीने सुरुवात झाली़ परंतु 10 वाजेनंतर मात्र नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाल़े
नंदुरबार पालिकेसाठी 12 र्पयत साधारणत 16 टक्के मतदान झाले तर नवापूर पालिकेसाठी 11 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आह़े सकाळी साडेसात वाजेपासून नंदुरबार व नवापूर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात करण्यात आली़ दोन्ही ठिकाणी सकाळी थंडीचा जोर जाणवत असल्याने मतदानासाठी तुरळक गर्दी दिसून येत होती़ परंतु 10 नंतर मात्र मतदारांची चांगलीच गर्दी दिसून आली़ नंदुरबार व नवापूर येथील विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या़  दरम्यान, नंदुरबार शहराच्या चौकांमध्ये नागरिकांकडून राजकीय चर्चा रंगताना   दिसून येत होत्या़ अत्यंत चुरशीच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार या विषयांवर चर्चाना उधाण आले होत़े शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आह़े 

Web Title: After trekking in Nandurbar and Navapura, there was a rush for the voting