अनेक वर्षानंतर भाताचे उत्पादन समाधानकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:12 IST2019-11-24T12:12:30+5:302019-11-24T12:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार ...

अनेक वर्षानंतर भाताचे उत्पादन समाधानकारक!
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात भाताचे उत्पादन समाधानकारक आले आहे. यंदा 212.16 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतांना यंदा त्यापेक्षा अधीक क्षेत्रात भाग लागवड करण्यात आली होती. सध्या पारंपारिक पद्धतीने भाग कापणी करून काढणीस सुरुवात झाली आहे.
नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भाग, नवापुर तालुका तसेच अक्कलकुवा तालुक्यातील काही भागात भाताची लागवड केली जाते. जिल्ह्यात भात पिकाचे 212.16 हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी त्यापेक्षा कमी क्षेत्रात लागवड होत होती.
पावसामुळे प्रमाण जास्त
यंदा समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात भात लागवडीचे प्रमाण ब:यापैकी वाढले. नंदुरबार तालुक्यात पूर्व भागात 140 टक्के तर नवापूर तालुक्यात 122 टक्के पाऊस झाला आहे. भात पिकाला पावसाचे प्रमाण अधीक असावे लागते. लागवडीनंतर देखीेल पुरेसे पाणी राहिले तर उत्पादन जास्त येते. यंदा सर्वच दृष्टीने पोषक स्थिती असल्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले आहे.
क्षेत्रात वाढ
यंदा भात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सर्वसाधारण 212.16 हेक्टर क्षेत्र असतांना जवळपास 250 हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर भाग लागवड झाली होती. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले आले आहे. आतार्पयत पावसाचे प्रमाण कमी राहत होते. भुगर्भातील पाणी पातळी देखील कमी राहत होती. त्यामुळे क्षेत्र दरवर्षी घटत होते. 200 हेक्टर क्षेत्रावर देखील लागवड होत नव्हती. शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन देखील अपेक्षीत रित्या येत नव्हते. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी असल्याने भात उत्पादक शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नुकसान फारसे नाही
परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यात जिल्ह्यतील अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असतांना भात पीक त्यापासून वाचले. त्यामुळे उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक ठिकाणीच विक्री
येथे उत्पादीत होणा:या भात अर्थात तांदूळाची विक्री स्थानिक ठिकाणीच केली जात असते. काही व्यापारी ठोक स्वरूपात खरेदी करीत असतात. तर काहीजण जवळच्या राईस मिलमध्ये भात विक्री करीत असतात.
वाण आणि चव वेगळी.. जिल्ह्यात भाताचे अर्थात तांदुळाचे विविध पारंपारिक वाण पिकविले जातात. त्यांच्या काढणी पद्धत ही पारंपारिक अर्थात हातसाळीची असल्याने हा तांदुळ चवीला चांगला असतो. त्यामुळे त्याला मागणी देखील मोठय़ा प्रमाणावर असते. कमोद, इंद्रायणी, खुशबू या वाणाला मोठी मागणी असते. भात उत्पादन घेणा:या शेतक:यांना आणखी पुरेसे मार्गदर्शन आणि उत्पादन वाढीसाठीची मदत मिळाली तर उत्पादन क्षमतेत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.