नंदुरबार पालिका पोटनिवडणुकीत छाननीत एक अर्ज बाद, चार अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:04 PM2018-06-27T12:04:01+5:302018-06-27T12:04:14+5:30

After filing nomination in the by-election of Nandurbar Municipal Corporation, four applications are valid | नंदुरबार पालिका पोटनिवडणुकीत छाननीत एक अर्ज बाद, चार अर्ज वैध

नंदुरबार पालिका पोटनिवडणुकीत छाननीत एक अर्ज बाद, चार अर्ज वैध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिका प्रभाग क्रमांक 16 अ च्या पोटनिवडणुकीसाठी दाखल पाच अर्जापैकी भाजपचे डमी उमेदवार रोहित चौधरी यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. आता माघारीकडे लक्ष लागले असून त्यावरच लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणुकीसाठी दाखल पाच अर्जाची छाननी मंगळवार, 26 रोजी सकाळी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वान्मती सी., सहायक अधिकारी गणेश गिरी, गोपाळ पाटील यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले रोहित प्रवीण चौधरी यांचा ए.बी.फॉर्म डबल जोडला होता. त्यामुळे तो अर्ज बाद ठरविण्यात आला. तर भाजपचे अधिकृत उमेदवार आकाश प्रवीण चौधरी, काँग्रेसच्या उमेदवार विद्या संजय चौधरी, अपक्ष उमेदवार मोहन छोटालाल श्रॉफ व मेघ:शाम मोहन श्रॉफ यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
माघारीची मुदत 2 जुलैर्पयत आहे. त्या मुदतीत कोण माघार घेतो यावरच लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे.

Web Title: After filing nomination in the by-election of Nandurbar Municipal Corporation, four applications are valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.