मजूरीसाठी गेलेल्या युवकाची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:57 IST2019-08-16T12:57:24+5:302019-08-16T12:57:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुकलट ता़ धडगाव येथून मजूरीसाठी नाशिक येथे गेलेल्या आदिवासी युवकाचा अपघातानंतर काम देणारा ठेकेदार ...

मजूरीसाठी गेलेल्या युवकाची परवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुकलट ता़ धडगाव येथून मजूरीसाठी नाशिक येथे गेलेल्या आदिवासी युवकाचा अपघातानंतर काम देणारा ठेकेदार आणि उपचार करणा:या रुग्णालयाने परवड करत मानसिक व शारिरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला़ या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पावरा समाज विकास संस्थेकडून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देण्यात आल़े
निवेदनात, धडगाव तालुक्यातील कुकलट दिलीप डेका पावरा (22) हा युवक दीड महिन्यापासून नाशिक येथे कामाला होता़ दरम्यान जुलै महिन्यात कामावर असताना इमारतीवरुन पडून त्याचा अपघात झाला़ त्याला ठेकेदार नरवडे याने उत्तमनगरातील डॉ़ संदीप मंडले यांच्या तिरुपती रुग्णालयात दाखल केले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना जखमी अवस्थेतील दिलीप पावरा यास मारहाण करुन हातापायाची बोटे तोडण्यात आली होती़ दिलीप याचे वडील डेका पावरा यांनी अंबड पोलीसात तक्रार देण्याचा प्रयत्न करुन दखल घेतली गेलेली नसल्याचे म्हटले आह़े
निवेदनावर बळीराम ओंकार बारेला, मंगेश जामसिंग पावरा, जेलसिंग बिजला पावरा, महेश तुंगार, लालसिंग डुडवे, डेका ना:या पावरा, सुरेश वनसिंग पवार, अनिल उदेसिंग पवार यांच्या सह्या आहेत़