प्रशासनाने पाहिले टंचाईचे वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:04 IST2019-05-13T21:03:40+5:302019-05-13T21:04:02+5:30
कुयरीडाबर : आता कायम स्वरूपी उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष

प्रशासनाने पाहिले टंचाईचे वास्तव
तळोदा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुयरीडाबर, पालाबार, चिरमाळ या पाड्यांना तालुका प्रशासनाने शनिवारी भेट देवून तेथील पाणी टंचाईसंदर्भातील उपाययोजनांच्या कामाची पाहणी केली. या वेळी एका विहिरीतून वाहणाऱ्या झिºयाचे पाणी खाली उतरून काही आदिवासी महिला पाणी भरत होत्या. या वेळी तेथील पाणीटंचाईचे भीषण वास्तव प्रशासनाने पाहिले.
तळोदा तालुक्यातील कुयरीडाबर, चिरमाळ, पालाबार, केलापाणी अशा दुर्गम भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या पाड्यांमधील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या वेळी या ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चादेखील केली होती. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने पाड्यांमधील पाणी व चारा छावण्यांबाबत तालुका प्रशासनास प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, इतर अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व संबंधीत ग्रामस्थांसह या पाड्यांना शनिवारी भेट दिली. हे सर्व अधिकारी केवलापाणीपर्यंत वाहनांद्वारे गेले. तेथून चार ते पाच किलोमीटर अंतर पायी डोंगर चढून वरिल पाड्यांना पोहाचलेत.
पायी डोंगर चढतांना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. अधिकाºयांनी प्रथमच गावाला भेट दिल्याने गावकरीही भारावले होते. तहसीलदार लोखंडे यांनी कुयरीडाबर येथील गावकºयांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींची (शेवडी) पाहणी केली. त्या वेळी एका शेवडीतून खाली उतरून तेथील झिरपणारे पाणी काही महिला घड्यात भरत असतांना त्यांनी पाहिले. हंडाभर पाण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागत असल्याची व्यथाही गावकºयांनी प्रशासनासमोर बोलून दाखविली. तेथून पुरेसे पाणी निघत नसल्यामुळे डोंगर उतरून खालील झºयाचे पाणी प्यावे लागत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
दरवर्षी उन्हाळ्यात आम्हाला भीषण पाणीटंचाईच्या समस्येस तोंड लागत असते. त्यामुळे कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर अधिकाºयांनी ग्रामपंचायतीमार्फत जुन्या विहिरींचे खोलीकरण काम हाती घेतले आहे. या कामांची पाहणी त्यांनी केली. साधारण १५ ते २० फुटापर्यंत ही विहीर खोल गेली आहे. या उपरांतही शेवडीस पुरेशे पाणी लागले नाही तर शेवटी केवलापाणी गावापर्यंत टँकरने पाणी नेऊन तेथून गाढवामार्फत पाड्यापर्यंत पाण्याचे नियोजन करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान जनावरांच्या चाºया बाबत सुद्धा परिसरातील रहिवाशांचा जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी होत्या. यामुळे तालुका पशुधन अधिकारी डॉ.सामुद्रे यांनी तेथील जनावरांची माहिती घेतली. या वेळी गावकºयांनी आपल्याकडील बैल, गायी, म्हशी, शेळी अशा पाळीव जनावरांची माहिती सांगितली. अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईबाबत पाहणी केल्यामुळे गावकºयांनी समाधान व्यक्त केले.