बोरद येथे वीजपंप चोरणारी टोळी सक्रीय

By Admin | Updated: January 11, 2017 00:22 IST2017-01-11T00:22:25+5:302017-01-11T00:22:25+5:30

बोरद : परिसरातील मोड ता़ तळोदा येथे रात्रीच्या वेळी घराजवळील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी सक्रीय झाली

Activa gang steals electric pump at Borod | बोरद येथे वीजपंप चोरणारी टोळी सक्रीय

बोरद येथे वीजपंप चोरणारी टोळी सक्रीय


बोरद : परिसरातील मोड ता़ तळोदा येथे रात्रीच्या वेळी घराजवळील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी सक्रीय झाली असल्याने पोलीस गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े
परिसरातील ग्रामस्थांनी घरात पाणीपुरवठा करण्यासाठी अंगणात मोटारी बसविल्या आहेत़ रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी परिसरातील           बहुसंख्य ग्रामस्थांच्या मोटारी चोरण्याचा प्रयत्न केला़ त्यात, राजेंद्र राजपूत यांची मोटार चोरुन नेण्यात चोरटय़ांना यश आल़े परिसरात बहुतेक ग्रामस्थांकडे मोटारी बाहेरच बसविण्यात आल्या असल्याने           भीतीचे वातावरण निर्माण झाले          आह़े  परिसरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनादेखील घडत असतात त्यामुळे  ग्रामस्थांमध्ये   रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी होत आह़े मोटारी चोरणा:या टोळीकडून सुमारे पाच मोटारींची           वीज कनेक्शन काढण्यात आले              होत़े परंतु ग्रामस्थ वेळीच                    सावध झाल्याने अधिक नुकसान टळल़े   
    (वार्ताहर)

बोरद पोलीस दूरक्षेत्राला एकूण 28 खेडी तसेच अतिदुर्गम भागातील पाडे जोडली गेली आह़े परंतु बोरद पोलीस दूरक्षेत्राला केवळ पाच पोलीस कर्मचारी देण्यात आले आह़े परंतु तेदेखील कधी तालुक्यांच्या कामांवर किवा कोर्टाच्या कामात व्यस्थ असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आह़े पोलीस कर्मचा:यांचा तुटवडा असल्याने परिसरातील भुरटय़ा चो:यादेखील वाढल्या आह़े मोड येथे अनेक वेळा पशुधन चोरीच्या घटनादेखील घडल्या आहेत़

Web Title: Activa gang steals electric pump at Borod