आपसात हाणामारी करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:43 IST2020-01-03T11:43:35+5:302020-01-03T11:43:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातीील महाराणा प्रताप पुतळा परिसरात हाणामारी करणाºया पाच जणांविरोेधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Action against those who commit one another | आपसात हाणामारी करणाऱ्यांवर कारवाई

आपसात हाणामारी करणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातीील महाराणा प्रताप पुतळा परिसरात हाणामारी करणाºया पाच जणांविरोेधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला होता़
३१ डिसेंबरच्या रात्री बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप पुतळा रस्त्यावर गौतम गोविंद काठेवाडी रा़ परदेशीपुरा, दिनेश बापू पवार रा़ एकता नगर, अशोक करकल बाटुंगे रा़ महाराणा प्रताप पुतळा, भारत बुधा शकत रा़ कंजरवाडा व नागेश संजय वेडगे रा़ एकता नगर हे किरकोळ वादातून आपसात झोंबाझोबी करुन हाणामारी करत असल्याचे शहर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला दिसून आले होते़ त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर संशयित आरोपी एकमेकांवर धावून जात होते़
याप्रकरणी गौतम काठेवाडी, दिनेश पवार, अशोक बाटुंगे, भारत शकत व नागेश शेडगे यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल बर्डे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयितांना पोलीसांनी नोटीस देऊन सोडून दिले होते़

Web Title: Action against those who commit one another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.