परीक्षा केंद्राबाहेर हुल्लडबाजी करणाऱ्या १४ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:00 IST2020-02-26T13:00:03+5:302020-02-26T13:00:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावीची परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आतमध्ये गोंधळ करणाºया १४ जणांवर पोलीसांनी ...

परीक्षा केंद्राबाहेर हुल्लडबाजी करणाऱ्या १४ जणांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बारावीची परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आतमध्ये गोंधळ करणाºया १४ जणांवर पोलीसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले़ जिल्ह्यात पाच पोलीस ठाण्यांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यांतर्गत जीटीपी महाविद्यालय आणि डी़आऱ हायस्कूल परीक्षा केंद्रात परीक्षा सुरु असताना १०० मीटर आतमध्ये प्रवेश करत हुल्लडबाजी करुन कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाºया सहा जणांवर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने कारवाई केली़
तळोदा येथील सिनीयर कॉलेज जवळ फिरणाºया चार जणांवर, शहादा येथील विकास हायस्कूल परीक्षा केंद्राजवळ फिरणारे दोघे, अक्कलकुवा येथे जामिया बी़एड कॉलेज आवारात फिरणारा एक तर बामखेडा ता़ शहादा येथील पुष्पावती मदन चौधरी माध्यमिक विद्यालय व इंदास हरी पटेल माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्राच्या आवारात फिरणारा अशा एका सारंगखेडा पोलीसांनी कारवाई केली़
सर्व चौदा जणांविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नंदुरबार शहर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़
नंदुरबार शहरात जीटीपी कॉलेज आणि डी़आऱहायस्कूल परिसरात दामिनी पथकाने सोमवारी ही कारवाई केली होती़ नंदुरबारातील सहा पैकी दोघे संशयित हे पालकच असल्याची माहिती समोर आली असून यातून पोलीसही अचंबित झाले होते़