नारीशक्तीच्या एकत्रिकरणाचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:27 IST2019-09-30T00:27:33+5:302019-09-30T00:27:54+5:30

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून २००४ मध्ये प्रभाताई कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही साऱ्याजणी’ या महिला संघटनेची स्थापना करण्यात आली. ही महिला संघटना आपल्या वेगळ्या उद्दिष्टांमुळे आणि कार्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. शहरामध्ये अनेक मंडळे, संघटना, क्लब विविध भागांमध्ये महिलांसाठी कार्यरत आहेत.

 The act of integration of femininity | नारीशक्तीच्या एकत्रिकरणाचे कार्य

नारीशक्तीच्या एकत्रिकरणाचे कार्य

संस्था परिचय
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून २००४ मध्ये प्रभाताई कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही साऱ्याजणी’ या महिला संघटनेची स्थापना करण्यात आली. ही महिला संघटना आपल्या वेगळ्या उद्दिष्टांमुळे आणि कार्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. शहरामध्ये अनेक मंडळे, संघटना, क्लब विविध भागांमध्ये महिलांसाठी कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. अशा मंडळाला एकत्र आणण्याचे कार्य आम्ही साºयाजणी या महिला संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथे काम करताना वैयक्तिक सभासदत्व दिले जात नसून संघटनेलाच सभासदत्व दिले जाते. त्यानिमित्ताने नारीशक्तीचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संपूर्ण शहरातील दहा महिला संघटना यामुळे जोडल्या गेल्या आहेत. वर्षातून तीन प्रमुख कार्यक्रमांसाठी सर्व महिला एकत्र येतात. यापैकी प्रमुख म्हणजे जागतिक महिलादिन, तीळगूळ समारंभ आहे. शहरातील सर्व भागांतील महिलावर्ग एकत्र येतात. विचारांचे आदान-प्रदान होते. एखादे मोठे कार्य किंवा सामाजिक संकट समयी नारीशक्ती एकत्र येते. महिला दिनानिमित्त सद्यस्थितीतवर विचारमंथन करण्यात येते. तसेच मान्यवरांची व्याख्याने, परिसंवाद व विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आदी कार्यक्रम घेतले जातात. तसेच नववर्ष स्वागत हा एक सौहार्दाचा कार्यक्रम असतो, तर ‘कला’ कार्यक्रमात महिलांच्या कलागुणांना वाव देत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतात. मंडळाच्या मार्फत आतापर्यंत महिलांसाठी आरोग्य शिबिर, वैद्यकीय तपासणी, कर्तृत्ववान महिलांचा गौरव, आदिवासी बांधवांना मदत, शिरवाडे गावाला खास दिवाळी फराळ वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांच्या बौद्धिक, आत्मिक विकासासाठी वक्त्यांची भाषणे व परिसंवाद होतात. गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत अध्यक्षपदाची धुरा प्रभाताई कुलकर्णी, दीपाली कुलकर्णी, संजीवनी कुलकर्णी यांनी सांभाळली. सध्या सीमा शिंपी या संघटनेच्या अध्यक्ष आहेत.

Web Title:  The act of integration of femininity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.