अपघात करणा:या वाहन चालकाला 1 वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:53 IST2019-07-03T11:53:19+5:302019-07-03T11:53:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील नांदरखेडा फाटय़ावर प्रवासी वाहनाला मागून येणा:या वाहनाने धडक दिली होती़ अपघातात दोन्ही वाहनातील ...

Accident: Or the driver gets 1 year imprisonment | अपघात करणा:या वाहन चालकाला 1 वर्ष कारावास

अपघात करणा:या वाहन चालकाला 1 वर्ष कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील नांदरखेडा फाटय़ावर प्रवासी वाहनाला मागून येणा:या वाहनाने धडक दिली होती़ अपघातात दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले होत़े याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात न्यायालयाने धडक देणा:या चालकाला 1 वर्षाचा कारावास दंडाची शिक्षा सुनावली़   
याबाबत विजय कांतीलाल पवार रा़ ठाणेपाडा ता़ नंदुरबार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने एमएच 18 एए 3462 वरील चालक शरद रामदास सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल होता़ पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम महाले यांनी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर नंदुरबार न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ए़विराणी यांच्या न्यायालयात खटला सुरु होता़ साक्षीपुराव्यांवरुन चालक शरद सोनवणे दोषी आढळल्याने त्यास न्यायालयाने 1 वर्ष कारावास तसेच एकूण सात हजार दंडाची शिक्षा दिली़ सरकार पक्षातर्फे अॅड़सी़ए़पाटील यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून रमेश माळी यांनी काम पाहिल़े 
 

Web Title: Accident: Or the driver gets 1 year imprisonment