शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रीक ‘थंब’ घेत कर्जमाफी प्रक्रियेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले कृषीमुक्ती योजनेला वेग आला असून शासनाने शेतकऱ्यांचे बायोमेट्रीक थंब स्विकारणे सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले कृषीमुक्ती योजनेला वेग आला असून शासनाने शेतकऱ्यांचे बायोमेट्रीक थंब स्विकारणे सुरु केले आहे़ यातून सात हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ‘अंगठा’ दिल्याने लवकरच त्यांची बँक खाती ‘निल’ होण्याचे संदेश शासनाकडून देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़खरीप हंगामासाठी पीककर्जाची मागणी करणाºया शेतकºयांना शासनाने केलेल्या कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा नसल्याने नवीन कर्ज घेण्यास अडचणी येत आहेत़ यावर मार्ग काढून शासनाने राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांसोबत चर्चा केली होती़ ही चर्चा एकीकडे सुरु असतानाच ‘लॉकडाऊन’मुळे बंद करण्यात आलेली कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे़ जिल्हास्तरावर यापूर्वी बँकांनी शेतकºयांची संपूर्ण माहिती अपलोड करुन तयार केली होती़ यातून ९ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या शाखांसह खाजगी व कोआॅपरेटीव्ह बँकांनी ३१ हजार शेतकºयांची खाती आधार सोबत जोडण्यात आली होती़ या प्रक्रियेनंतर आधार लिंक झालेल्या खात्याला केवळ शेतकºयांचा बायोमेट्रीक थंब देण्याची गरज होती़ परंतू लॉकडाऊनमुळे बायोमेट्रीक थंब देण्याची ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती़ गेल्या आठवड्यात शासनाने ही प्रक्रिया पुन्हा सुरु केली असून थंब करणाºया शेतकºयांना लवकरच कर्जमुक्तीचा मेसेज येण्याची शक्यता बँकिंग वर्तुळातून वर्तवली जात आहे़ शेतकºयांच्या ‘थंब’मुळे त्यांच्या थकीत कर्जाची माहिती आॅनलाईन होवून बँकांना कामकाज करणे सोपे होणार आहे़ दरम्यान सोमवारी जिल्ह्यात होणाºया कर्जमाफी मेळाव्यात कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांनाही अर्ज देता यावे असे नियोजन करण्यात आल्याची माहिती बँकांकडून देण्यात आली आहे़ज्या शेतकºयांनी आतापर्यंत माहिती सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक थंब करुन घेतले आहे़ त्यांना अद्याप कर्जमाफ झाल्याचा मेसेज आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे़

 

सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे

जिल्ह्यात एकूण ३१ हजार ३६४ शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे़ यात सर्वाधिक १४ हजार ३१३ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद आहेत़ त्याखालोखाल स्टेट बँक आॅफ इंडिया ४ हजार ४५६, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३ हजार ५९० अशा १५ बँकांमधील ३१ हजार शेतकरी पात्र आहेत़ या शेतकऱ्यांच्या खात्यावर शिल्लक असलेले थकीत कर्जाच्या रकमेची माहिती यापूर्वीच अपलोड झाली आहे़ बायोमेट्रिक थंब झाल्याने कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले आहे़

९० कोटींच्या मागणीकडे लक्ष लागून

४शनिवार सायंकाळपर्यंत जिल्हा बँकेच्या १४ हजारपैकी सात हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक थंब करुन दिला आहे़ नवीन आठवड्यात सर्व शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतील अशी शक्यता आहे़४१४ राष्ट्रीयकृत बँकांच्या १५ हजार ८५१ शेतकऱ्यांची बायोमेट्रिकची प्रक्रियाही याच आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे़४दरम्यान १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जाची माफी होणार आहे़ कर्ज घेणाºया १४ हजार शेतकºयांच्या नावांच्या ३०७ याद्यांची तपासणी लेखापरीक्षक यांनी केली आहे़ यानुसार शेतकºयांची ८५ कोटी १५ लाख ६६ हजार रुपयांची कर्जमाफी प्रलंबित आहे़ या माफीच्या रकमेसाठी जिल्हा बँकेने शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे़ परंतू अद्याप त्यात यश आलेले नाही़ लवकरच शिखर बँक यावर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे़ २०१५ ते २०१९ या काळात धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने १४ हजार शेतकºयांना दिलेले कर्ज हे केवळ ६३ कोटी रुपये असून २१ कोटी २५ लाख रुपये हे त्या रकमेचे व्याज आहे़