मेहंदीपाडा येथे घर जळून खाक

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 15, 2023 19:32 IST2023-04-15T19:32:19+5:302023-04-15T19:32:42+5:30

नंदुरबार : तालुक्यातील मेहंदीपाडा गावात घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आगीत अडीच लाखांचे ...

A house burnt down in Mehndipada | मेहंदीपाडा येथे घर जळून खाक

मेहंदीपाडा येथे घर जळून खाक

नंदुरबार : तालुक्यातील मेहंदीपाडा गावात घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आगीत अडीच लाखांचे नुकसान झाले असून संसार उघड्यावर आला आहे.

मेहंदीपाडा येथील दारासिंग पिरू कोकणी यांच्या घराला सकाळी अचानक आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले, परंतु उपयोग झाला नाही. संपूर्ण घर जळून खाक झाले. संसारोपयोगी सामान, नुकताच शेतातून काढून आणलेला गहूदेखील जळाल्याने संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीत २ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: A house burnt down in Mehndipada