भरधाव दुचाकीच्या धडकेत बालिका ठार
By मनोज शेलार | Updated: April 5, 2024 16:52 IST2024-04-05T16:52:06+5:302024-04-05T16:52:21+5:30
नंदुरबार : भरधाव दुचाकीने रस्त्याने पायी जाणाऱ्या बालिकेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना देवमोगरानगर, ता. अक्कलकुवा येथे गुरुवारी ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत बालिका ठार
नंदुरबार : भरधाव दुचाकीने रस्त्याने पायी जाणाऱ्या बालिकेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना देवमोगरानगर, ता. अक्कलकुवा येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल सोकऱ्या पाडवी (तीन वर्ष) रा. देवमोगरानगर असे मयत बालिकेचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर उरशा पारता राऊत हा सोकऱ्या पाडवी यांच्या पायल या मुलीला घेऊन पायी रस्त्याने जात असताना देवमोगरानगर नजीक भरधाव आलेल्या दुचाकीने (एमएच १९ एबी ८४२) पायल हिला जबर धडक दिली. दुचाकीवर तीनजण असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पायल हिला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीचालक तेथून पसार झाला. याबाबत सोकऱ्या पाडवी यांनी फिर्याद दिल्याने दुचाकी चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार महेंद्र जाधव करीत आहे.