नंदुरबारमध्ये महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल

By भूषण.विजय.रामराजे | Updated: April 18, 2023 17:32 IST2023-04-18T17:31:48+5:302023-04-18T17:32:59+5:30

आशाबाई या १३ एप्रिल रोजी डोंगरगाव ता. शहादा येथे नात लक्षिका हिला भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु त्यांना भेटू देण्यात आले नव्हते. यातून त्यांना संबंधितांकडून शिवीगाळ करण्यात आली होती.

A case has been registered against three people for inciting a woman to commit suicide in nandurbar | नंदुरबारमध्ये महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा पुलावरून उडी घेत ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेच्या चिठ्ठीवरून डोंगरगाव ता. शहादा येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाई नागो मोरे (४५) रा. साक्री रोड, धुळे असे मयत महिलेचे नाव आहे.

आशाबाई या १३ एप्रिल रोजी डोंगरगाव ता. शहादा येथे नात लक्षिका हिला भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु त्यांना भेटू देण्यात आले नव्हते. यातून त्यांना संबंधितांकडून शिवीगाळ करण्यात आली होती. यातून मनस्ताप झाल्याने आशाबाई मोरे या थेट सारंगखेडा येथील तापी नदी पुलावर आल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी उडी घेत आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून दिली होती. यातून जगन्नाथ कृष्णा शिंदे (६०), पंकज जगन्नाथ शिंदे (३५) व मंजुषा रोशन मोरे (३२) या तिघांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले होते.

याप्रकरणी भूषण नागो मोरे रा. साक्री रोड यांनी सोमवारी सायंकाळी सारंगखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जगन्नाथ शिंदे, पंकज शिंदे व मंजुषा मोरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करत आहेत.

Web Title: A case has been registered against three people for inciting a woman to commit suicide in nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.