शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

८४ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या १६० पैकी ८४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या १६० पैकी ८४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला़ हे सर्व ८४ नमुने नेगेटिव्ह असून यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे़ एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अहवाल निगेटिव्ह आल्याची ही पहिलीच वेळ आहे़नंदुरबार शहरात कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू तर खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण महिला आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत १०० पेक्षा अधिक जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्याकरीता घेतले होते़ यामुळे रविवारपासून धुळे वैद्यकीय महाविद्यालयाकडे १६० स्वॅब नमुने प्रलंबित होते़ या नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला़ यातील ८४ नमुने निगेटिव्ह आले असून यात मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तासाठी पाठवण्यात आलेल्या कोरोनबाधित पोलीसाच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल आहेत़ हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत़ आरोग्य विभागाने आतापर्यंत ९१२ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी केली आहे़ यातील ७८९ नमुने हे निगेटिव्ह आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दोन जणांचा बळी गेला आहे़ एकीकडे बळींचा आकडा कमी असल्याचा दिलासा असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे़ रविवारी अक्कलकुवा पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे़ येत्या दोन दिवसात शहाद्यातील उर्वरित पाच जणांचे अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे़बिहारला गेलेले विद्यार्थी पॉझिटिव्हदरम्यान एकीकडे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे अक्कलकुवा येथून नंदुरबार मार्गाने बिहार राज्यात गेलेल्या आणखी सात विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे़ बिहार राज्यातील सहरसा येथील जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे़ अद्याप जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही़ येथून गेलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती़ जामिया संस्थेनेही विद्यार्थ्यांची सलग दोन दिवस आरोग्य तपासणी करुन त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवले असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते़लांबोळ्यातील मयत वृद्धेचे कोविड नियमानुसार अंत्यविधीशहादा : तालुक्यातील लांबोळा येथील ६२ वर्षीय मयत महिलेवर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत़ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती असून प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी त्याला दुजोरा दिला होता़लांबोळा येथील मृत महिलेस श्वसनाचा त्रास व अन्य आजाराची पार्श्वभूमी होती तथापि आरोग्य प्रशासनामार्फत सदर महिलेस श्वसनाचा त्रास असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ प्राथमिक माहितीनुसार या महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नव्हता आणि जिल्हा रुग्णालयात महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला होता़ सदर महिलेचा मृत्यू हा कोरोना मुळे झाला असल्याचा समज निर्माण झाला होता़ सोशल मीडियातही महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे मेसेज फिरल्याने भीती व चिंता निर्माण झाली होती़ परंतू सोमवारी स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यासह प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे़मृत महिलेचे अंत्यसंस्कार व उपचार करताना प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़