चनवाईपाडा येथे घरातून 51 हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:02 IST2019-07-08T12:02:20+5:302019-07-08T12:02:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील चनवाईचा कारभारीपाडा येथे दोघांनी घरात घुसून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची ...

51 thousand rupees left from the house at Chandiyepada | चनवाईपाडा येथे घरातून 51 हजाराचा ऐवज लंपास

चनवाईपाडा येथे घरातून 51 हजाराचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील चनवाईचा कारभारीपाडा येथे दोघांनी घरात घुसून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आह़े 13 जून रोजी सायंकाळी सात वाजता घडलेल्या घटनेप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
शंकर सोत्या वसावे यांच्या चनवाईचा कारभारापाडा येथील घरात घुसून रेमा दमण्या वळवी रा़ कात्रीचा हाणीपाडा ता़ धडगाव व ललिता जोठय़ा तडवी रा़ बिजरीगव्हाण ता़ अक्कलकुवा या दोघांनी अनधिकृत रितीने प्रवेश करुन 51 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल़े 
घरात ठेवलेले दागिने आणि पैसे दिसून न आल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यानंतर दोघांवर संशय बळावला होता़ त्यानुसार वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल दिपक करत आहेत़ 
 

Web Title: 51 thousand rupees left from the house at Chandiyepada