39 किलोमीटर अंतरात 13 ठिकाणी रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:46 IST2019-08-14T12:45:39+5:302019-08-14T12:46:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अक्कलकुवा ...

39 किलोमीटर अंतरात 13 ठिकाणी रस्ता बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान असलेल्या घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळून रस्ता बंद झाला आहे. सहा ठिकाणी लहान-मोठे पूल वाहून गेले तर सात ठिकाणी रस्त्यावर मोठय़ा दरडी कोसळल्या आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील घाटाच्या तीन किलोमीटरच्या आत जास्त पूल तुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. माळीआंबाच्याखाली तीन किलोमीटर्पयतच्या मार्गावर माती असल्याने रस्ता बंद झाला आहे. देवगोईहून माळीआंबार्पयत वाहन पोहोचू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी मशीन पाठवून रस्ता साफ करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र पूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. डाबच्या माळीआंबापाडा येथे संततधार पावसामुळे पाच घरे क्षतिग्रस्त झाल्याने नुकसान झाले तर एक घोडाही वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही पूर्णपणे खंडित झाला आहे. कोयलीविहीर, कंकाळमाळ ते वाडीखालीपाडा खाई व कोरजाबारी ते खाई हे दुर्गम भागातील रस्तेही बंद झाले आहेत. मोलगी येथून अक्कलकुवा येथे येण्यासाठी अनेक प्रवासी घाटार्पयत वाहनाने येतात व मधील तीन किलोमीटर्पयत पायी प्रवास करून अलिकडील वाहनातून अक्कलकुवा गाठण्याची कसरत करतात. सध्या पाऊस बंद असल्यामुळे मातीचे ढिगारे सरकवण्याचे काम सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुणाल पटले यांनी सांगितले. मात्र या कामाला गती देण्याची गरज आहे.